प्रत्येक क्षेत्रात स्वदेशीचा नारा देणारे योगगुरू बाबा रामदेव यांचाही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.कहर म्हणजे यावरुन विरोध पक्षातील नेत्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली आहे. नरेंद्र मोदी चीटिंग करतात असे सांगणारा विरोधकांचा फोटो लोकांनी प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला आहे.आता 5001000 रुपयांच्या नोटांचा काही उपयोग नसल्याने या नोटांमधून आता फरसाण वगैरे खाल्ले जात असल्याचा फोटोही व्हायरल झाला आहे.कतरिना कैफने केलेले आयटम साँग "चिकनी चमेली" गाण्यातील "नोट हजारों के खुल्ला छुट्टा कराने आई" हे बोल वापरुन कतरिनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला."एक हजाराची नोट" हा मराठी सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमातील कलाकारांचे चेहरे नोटवर छापून हजाराच्या नोटेची खिल्ली सोशल मीडियावर उडवण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर शरद पवारांचा हा फोटो सर्वाधिक व्हायरल झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही टार्गेट करण्यात आले आहे. बारामतीहून मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आलेल्या नोटांचे ट्रक्स निघाले आहेत अशा आशयाचा फोटो व्हायरल झाला आहे.500/1000 रुपयांच्या नोटा बकरीला चरण्यासाठी देण्यात आल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. काहींनी तर सोबत आता या नोटा बकरीदेखील चरणार नाही असे म्हणत खिल्ली उडवली आहे.देशवासियांनी एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. एटीएमबाहेर गर्दी करणा-यांचीही सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली आहे.500/1000 रुपयांच्या नोटा मोडीत काढल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर वरील पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करत मोदींच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांचे कौतुक केले आहे.सोशल मीडियावर मोदींचे कौतुक करणारे पोस्ट शेअर करण्यात आले. "एकच फाईट वातावरण टाईट" असा संदेश लिहिलेला मोदींचा फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.