शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुकाराम मुंढेंनाही तरुण नेत्याच्या निधनाचं दु:ख, ट्विटरवरुन भावूक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 4:04 PM

1 / 12
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती.
2 / 12
त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली.
3 / 12
त्यांच्या निधनानंतर देशभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही त्यांचे फोटो शेअर करत आठवणी जागवल्या जात आहेत.
4 / 12
काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्विट करुन सातव यांच्या निधनाची बातमी दिली. त्यानंतर, आता त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कलमदोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
5 / 12
''राजीव सातव यांचं पार्थिव थोड्यात वेळात पुण्यातून हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहे. सातव यांच्या पार्थिवावर त्यांचं मूळगाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कळनमुरी याठिकाणी उद्या 17 मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,'' अशी माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.
6 / 12
आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच स्थानिक काँग्रेस नेते मोहन जोशी दीप्ती चौधरी कमल व्यवहारे यावेळी रुग्णालयात ऊपस्थित होते. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता कळमनुरी या त्यांच्या गावात अंत्यसंस्कार होतील.
7 / 12
सातव यांच्या निधनानंतर ट्विटरवर दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. खासदार शरद पवार यांनीही ट्विट करुन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.
8 / 12
तुकाराम मुंढेंनीही राजीव सातव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलंय. 'युवा नेते राजीव सातव यांचं कोरोनानं निधन. एक आश्वासक लोकनेत्याच्या अकाली निधनानं संपूर्ण देश शोकात आहे.', असं मुंढे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.
9 / 12
कोरोनामुळे आपल्या देशाची मोठी हानी झाली आहे. या संकटात आपण आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींचं संरक्षण केलं पाहिजे, असेही तुकाराम मुंढेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
10 / 12
तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही श्रद्धांजली वाहिली. देशातील काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त करत ही मोठी हानी असल्याचं म्हटलंय. तर, अभिनेता रितेश देशमुखनेही हे अत्यंत धक्कादायक वृत्त असल्याचं म्हटलंय.
11 / 12
सातव यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते.
12 / 12
ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर, रविवारी त्यांचे निधन झाले. काँग्रचे प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेRajeev Satavराजीव सातवcorona virusकोरोना वायरस बातम्या