शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘आमच्या सुख-दु:खात नेहमी मला साथ…’ उदयनराजेंनी पत्नीला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 12:19 AM

1 / 4
भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या खास अंदाजासाठी ओळखले जातात. त्याच खास अंदाजात त्यांनी आज पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2 / 4
उदयनराजेंनी त्यांची पत्नी दमयंती यांना दिलेल्या शुभेच्छांची आज सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतआहे.
3 / 4
फेसबूकवर पत्नीला शुभेच्छा देताना लिहिलेल्या पोस्टमध्ये उदयनराजे म्हणाले की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतो. राजकारण, समाजकारण तसेच आमच्या सुखदुःखात नेहमी मला साथ आणि सोबत देणाऱ्या सहचारिणी राणीसाहेब आपणास वाढदिनी अनंत शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
4 / 4
उदयनराजे आणि दमयंती यांचा विवाह हा २० नोव्हेंबर २००३ रोजी झाला होता. दरम्यान, पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उदयनराजेंनी राजकारण, समाजकारण तसेच आमच्या सुखदुःखात नेहमी साथ दिल्याबद्दत त्यांचे आभार मानले आहेत.
टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेFamilyपरिवारSocial Viralसोशल व्हायरल