1 / 6एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच शिवसेनेला राज्यातील सत्ता गमवावी लागली होती. मात्र या धक्क्यातून सावरत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 2 / 6शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 3 / 6यावेळी कालपासून कौतुक होत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले की, काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं, अपघात तर होणार नाही ना.4 / 6काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ खडसेंसमोरील माईक खेचला. पुढे काय काय खेचतील ते माहित नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. 5 / 6दरम्यान, काल संध्याकाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रश्नांना उत्तरं देत असताना अचानक फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक खेचला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेच अवाक झाले होते. 6 / 6त्याचं झालं असं की, पत्रकार परिषदेदरम्यान, एकनाथ शिंदेंना संतोष बांगर हे कोणत्या पक्षातून तुमच्या पक्षात आले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाने एकनाथ शिंदे गोंधळले. काय उत्तर द्यावं हे त्यांना कळेना, कुठल्या पक्षामधून काय, ते शिवसेनेतून आलेत ना, असं ते म्हणाले. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोरून माईक खेचला आणि सूत्रे आपपल्या हाती घेतली. संतोष बांगर हे शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेतून आले, आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते, असं हजरजबाबी उत्तर फडणवीसांनी दिलं होतं.