ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 15 - शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील विरोधकांनी पुन्हा एकदा संयुक्त संघर्ष यात्रा काढली आहे. संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्यात शनिवारी विरोधक जळगावात दाखल झाले होते. यावेळी विरोधकांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुक्ताईनगरमध्ये भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विखे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी खडसेंच्या फार्म हाऊसवर त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विरोधपक्षातील नेत्यांनी एकनाथ खडसेंसोबत फराळ केला. या राजकीय फराळाची सध्या प्रचंड चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे,या मागणीसाठी विरोधकांनी दुस-या टप्प्यातील संघर्ष यात्रा सिंदखेडराजा येथून सुरू केली आहे. https://www.dailymotion.com/video/x844vpyकाँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीचीही बैठकविविध विरोधी पक्षांनी एकजुटीची मूठ बांधून शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेच्या रुपाने पुकालेले आंदोलन जिल्हय़ात यशस्वी व्हावे, यानुषंगाने ८ एप्रिल रोजी बचत भवन बुलडाणा येथे जिल्हा काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघर्ष यात्रा व सभेबाबतचे नियोजन ठरविण्यात आले.