पुणे : मराठा क्रांती मूक मोर्चाची वज्रमूठ छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने आवळली असून, महिलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा ‘नि:शब्द एल्गार’ विधान भवनावर रविवारी धडकला. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्यात सुधारणा करावी, या मागण्यांसाठी मराठा समाज पुण्यात रस्त्यावर उतरला होता.जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन मराठा क्रांती मोर्चाची सांगता .- मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार झाले सहभागी, पवारांचा फोटो काढण्यासाठी एकच गर्दी -आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर मोर्चात सहभागी मराठा मोर्चामध्ये शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या वेशात आले चिमुकले मोर्चात सहभागी होण्यासाठी सुरेखा ढवळे या अपंग महिला पुरंदरहून आल्या. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्ष्यणियनदीपात्रातील परिसर झाला भगवामय मोर्चामध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप झाले सहभागीमोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यातील 70 मीटर उंच शिडी असलेली ब्रॅंटो गाडी तैनात .-मराठा मोर्चाला राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंची उपस्थितीरविवारी सकाळी सर्व मोर्चेकरी डेक्कन येथील संभाजीमहाराज यांच्या पुतळ्याजवळ जमणार आहेत. पुतळ्याच्या परिसराची धुरा सर्वस्वी महिला सांभाळणार आहेत. चार मुली संभाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर जिजाऊवंदना तसेच पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल. डेक्कन बसथांब्यापासून जंगलीमहाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्यासह (पान ७ वर)ध्वनिवर्धकावरून सूचनाडेक्कन ते शगुन चौक आणि विधान भवन तेनेहरू मेमोरियल हॉल, नरपतगीर चौकादरम्यान ध्वनिवर्धक बसविण्यात आले आहेत. तसेच२० आॅटो रिक्षांवरही स्पीकर लावण्यात आलेलेअसून, त्याद्वारेही माहिती देण्यात येईल.विधान भवन परिसरातही मुख्य मंचाजवळमहिलाच नेतृत्व करणार आहेत. मोर्चातील४ तरुणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील.त्यानंतर निवेदनाचे वाचन केले जाणार असून, राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होईल.मोर्चाची जय्यत तयारीपुणे : मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चासाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच २१ वॉच टॉवर्सद्वारे या मोर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.पुण्यात लाखोंच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाचा ड्रोनच्या सहाय्याने घेतलेला हा व्हिडीओ डेक्कन येथे लोखो मराठा बांधवांची हजेरी, रस्ता भगव्या ध्वजाच्या गर्दीने फुलला. मोर्चा पुढे गेल्यावरही टिळक चौकाच्या मागे 4-5 किलोमीटरच्या रांगा