Walker Tiger covers over 3,000 km to zero in on his new home
शाब्बास पठ्ठ्या! वाघिणीच्या शोधात ‘या’ वाघानं असा पराक्रम केला, जो देशात इतरांना जमला नाही By प्रविण मरगळे | Published: November 18, 2020 2:16 PM1 / 10अलीकडेच मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना एका पट्टेदार वाघाचं दर्शन झालं, या वाघाचा व्हिडीओ समोर आला आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक आहे. एकट्या ताडोबामध्ये ७० पेक्षा अधिक वाघ आहेत. ताडोबात दरवर्षी पर्यटक वाघांचे दर्शन मिळावं यासाठी जातात.2 / 10वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. २९ जुलै हा जागतिक वाघ दिवस म्हणून साजरा केला जातो. वाघ हा मांजरवर्गीय सर्वात मोठा प्राणी असून तो क्रूर शिकारी आहे. त्याचे वजन सुमारे १०० ते १८० किलोपर्यंत भरते. 3 / 10वाघ ६५ किमी ताशी वेगाने पळू शकतो, वाघाचे जबडे त्याच्या पंजाहून अधिक ताकदीचे असतात. ज्याच्या मदतीने वाघ शिकार घट्ट पकडून ठेवू शकतो ओढून नेऊ शकतो. वाघीण एका वेळी ३ ते ४ पिल्लांना जन्म देते. 4 / 10वाघ हा हत्ती सोडून इतर कोणत्याही प्राण्याची शिकार करु शकतो, वाघ सहसा एकटे शिकार करतात. वाघ अनेक किमी प्रवास करु शकतात. उत्तम पोहू शकतात, एकाचे वाघाचे आयुष्य सुमारे २० वर्ष असते. 5 / 10भारताच्या एका वाघाने अनवधानाने त्याच्या नावे खास विक्रम केला आहे. वॉकर नावाच्या वाघाने ९ महिन्यात ३००० किमी चा प्रवास महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत आणि तेलंगणाच्या काही भागांतून पूर्ण केला आहे आणि यापूर्वी कोणत्याही वाघाने असा पराक्रम केला नाही.6 / 10गेल्या वर्षी फेब्रुवारीत वॉकरला रेडिओ कॉलर बसविण्यात आला होता आणि हा वाघ जंगलात प्रवास करत राहिला. जीपीएस उपग्रहाच्या मदतीने दर तासाला याचा मागोवा घेण्यात येत होता आणि संपूर्ण प्रवासात या वाघाने ५००० नवीन ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली.7 / 10नऊ महिन्यांच्या प्रवासानंतर हा वाघ मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या अभयारण्यात स्थायिक झाला. या वर्षाच्या एप्रिलमध्ये हा रेडिओ कॉलर काढला गेला. २०५ चौरस किलोमीटरच्या परिघात पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात निळे बैल, रानडुकर, बिबट्या, मोर आणि हरिण यासारखे प्राणीही आढळतात.8 / 10मागील हिवाळ्यात आणि यावर्षी उन्हाळ्यात वॉकर नद्या, महामार्ग, शेतात आणि कोठारांमध्ये फिरला. महाराष्ट्रात हिवाळ्याच्या काळात कापसाची लागवड होते आणि यामुळे वॉकरला शेतात लपून राहण्यास मदत झाली आहे. तो बहुधा रात्री प्रवास करीत असे आणि या वेळी तो रानडुकरांसारखे प्राणी खाऊन राहत असे. इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की इथल्या बर्याच प्राण्यांमध्ये वॉकर हा पहिला वाघ असेल.9 / 10या अभयारण्यात मादी वाघ आणणे योग्य होईल की नाही यावरही येथील प्रशासन विचार करीत आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ वन अधिकारी नितीन काकोडकर यांनी बीबीसीशी संवाद साधताना सांगितले की, वाघ कदाचित या ठिकाणी शिकार किंवा जोडिदाराच्या शोधात स्थायिक झाला असावा. 10 / 10ते पुढे म्हणाले की, मादी वाघ येथे आणण्याचा निर्णय घेणे सोपे होणार नाही कारण हे मोठे अभयारण्य नाही. त्याभोवती शेत आहेत आणि जर वॉकरने बछडे जन्माला घातले तर या ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतील. आणि लहान अभयारण्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications