ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १५ : तानसा जलनाहीनीची तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे मुंबईमध्ये पाणी कपात केली जणार आहे. कोणत्या ठिकाणी केव्हां पाणी येईल त्याची सविस्तर माहीती खालील प्रमाणे आहे. जलवाहीनीचे काम सुरु असल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहणाच्या रांगाचा रागां लागलेल्या आहेत. गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथील अस्तित्वात असलेल्या १४५० मी.मी व्यासाच्या तानसा पुर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम दि. १५.०६.२०१६ रोजी सकाळी ०८.०० वाजेपासून सुरु होऊन ते दि. १६.०६.२०१६ रोजी सकाळी ०८:०० वाजेपर्यंत पुर्ण करण्यातयेणार असल्याने या कालावधीत डी विभाग, ई विभाग, जी/उत्तर व जी/दक्षिण विभागातील पाणी पुरवठयावर खालील प्रमाणे परिणाम होणार आहे. डी विभागबुधवार दि.१५.०६.२०१६ रोजी सकाळी ०८:०० ते गुरुवार दि. १६.०६.२०१६ रोजी संकाळी ०८:०० नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल स्टेशन या भागात पाणी पुरवठा होणार नाही ई विभागबुधवार दि.१५.०६.२०१६ रोजी सकाळी ०८:०० ते गुरुवार दि. १६.०६.२०१६ रोजी संकाळी ०८:००कस्तुरबा हॉस्पिटल या भागात पाणी पुरवठा होणार नाहीजी/दक्षिणबुधवार दि १५.०६.२०१६ रोजी दुपारी ०२:०० ते दुपारी ०३:०० - डिलाई रोड ना. म. जोशी बी.डी.डी चाळ या भागात पाणी पुरवठा होणार नाही जी/दक्षिणबुधवार दि. १५.०६.२०१६ रोजी दुपारी ०४:०० ते संध्याकाळी ०७:०० - सिटी सप्लाय प्रभादेवी जनता कॉलनी आदर्श नगर्,एलफिस्टन लोअर परेल या भागात पाणी पुरवठा होणार नाहीजी/दक्षिणगुरुवार दि. १६.०६.२०१६. रोजी सकाळी ०४:०० ते सकाळी ०७:०० - क्लार्क रोड धोबी घाट सातरस्ता या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. जी/दक्षिणगुरुवार दि. १६.०६.२०१६ रोजी सकाळी ०४:३० ते सकाळी ०७:४५ -डिलाई रोड ना.म. जोशी बी.डी.डी चाळ. ना.म. जोशी मार्ग सखाराम बाळा पवार मार्ग महादेव पालव मार्ग या भागात पाणी पुरवठा होणार नाही. जी/उत्त्तरबुधवार दि. १५.०६.२०१६ रोजी दुपारी ०४:०० ते संध्याकाळी ०७:०० तसेच संध्याकाळी ०७:०० ते रात्री १०:००एलफिस्टन,काकासाहेब गाडगीळ मार्ग,सेनापती बापट मार्ग,गोखले रोड, वीरसावरकर रोड,एल.जे. रोड,सयानी रोड, भवानी शंकर रोड,सेनाभवन परिसर, मोरी रोड, टि.एच. कटारीया मार्ग,कापड बाजार, पुर्ण माहिम (प) विभाग, माटुंगा (प) विभाग,दादर (प) या विभागात पुर्णत: पाणी पुरवठा होणार नाही.