What exactly is an IFSC center? Who owns Gift City? Find out ...hrb
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 6:14 PM1 / 11देशाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर मुंबईमध्ये प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या गांधीनगरला १ मे रोजीच हलविण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून याबाबतचे आरोप करण्यात येत होते. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये हे केंद्र उभारण्यात येणार आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी २००६ मध्ये या केंद्राला मंजुरी दिली होती. 2 / 11गांधीनगर देशाचे आर्थिक केंद्र बनावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. तिथे गिफ्ट सिटी उभारणे हा त्याचाच भाग आहे. खरेतर बीकेसीमध्ये IFSC केंद्रासाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, फडणवीस सरकारला ही जागा बुलेट ट्रेनसाठी देण्यास केंद्राने सांगितले होते. तेव्हापासूनच यावर वाद निर्माण झाला होता. 3 / 11IFSC सी केंद्र म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा हे असे केंद्र आहे जिथे भारतीयांना परकीय चलनातून व्यवहाराची सेवा पुरविण्यात येते. या केंद्रात असलेल्या सेवा पुरवठादारांना आरबीआयच्या फेमा कायद्यांतर्गत परदेशी आस्थापनांचा दर्जा दिला जाणार आहे. या ठिकाणी परकीय चलनांमध्येच व्यवहार केले जाणार आहेत. 4 / 11गिफ्ट सिटीची ओळख ही आंतरराष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी हे केंद्र उभारण्यात येणार आहे. ही सिटी यामुळे जगाच्या नकाशावर आर्थिक केंद्र म्हणून उदयास येईल. 5 / 11देशात सध्या परकीय चलनाचा व्यवहार ऑफशोर वित्तिय केंद्र, कॉर्पोरेट संस्था आणि परदेशी संस्थांच्या भारतीय शाखांच्या माध्यमातून करण्यात येतो. हा व्यवहार IFSC द्वारे करण्यात येणार आहे. 6 / 11आरबीआय, आयआरडीएआय आणि सेबीच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या कंपन्या व वित्तिय संस्था या केंद्रामध्ये त्यांची शाखा सुरु करु शकणार आहेत. बँका, विमा कंपन्या, ब्रोकिंग कंपन्या, गुंतवणूक सल्लागार यामध्ये येतात. 7 / 11गांधीनगरच्या गिफ्ट सिटीमध्ये दोन भाग असणार आहेत. पहिल्यामध्ये देशांतर्गत आणि दुसरा विशेष आर्थिक क्षेत्र असेल. यापैकी देशांतर्गत विभागात रुपयाशी संबिधीत व्यवहार केले जाऊ शकतात. युरोप, सिंगापूरच्या जागतिक दर्जाच्या कंपन्या याठिकाणी येण्यासाठी उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. 8 / 11डिसेंबर २०१७ मध्ये देशाचे दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयएफएससीचे मुख्यालय गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्येच असणार असल्याचे लोकसभेत सांगितले होते. त्यानुसार १ मे रोजी याचा निर्णय घेण्यात आला. 9 / 11डिसेंबर २०१७ मध्ये देशाचे दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयएफएससीचे मुख्यालय गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्येच असणार असल्याचे लोकसभेत सांगितले होते. त्यानुसार १ मे रोजी याचा निर्णय घेण्यात आला. 10 / 11या केंद्रातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ५ लाख रोजगार मिळणार आहेत. या सिटीमध्ये डेटा सेंटर, स्टेट ऑफ द आर्ट कनेक्टिव्हीटी आणि अत्याधुनिक वाहतूक सुविधा मिळणार आहेत. याशियाव पर्यावरणाचीही काळजी घेण्यात येणार आहे. 11 / 11या सिटीची निर्मिती गिफ्ट सिटी को. लिमिटेड या कंपनीकडून करण्यात येत आहे. हा प्रकल्प तोट्यात असलेल्या आयएल अँड एफएस आणि गुजरात सरकारच्या मालकीच्या शहर विकास कंपनीच्या निम्म्या निम्म्या मालकीचा आहे. गिफ्ट सिटीमध्ये ५७.०६ लाख चौरस फूट जागेवर बांधकाम केले जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications