शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 11:13 AM

1 / 9
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची बिश्नोई गँगने मुंबईत त्यांच्या मुलाच्या कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या केली. लीलावती हॉस्पटलच्या डॉक्टरांनी अडीज तास त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या नेत्याला लोकांसमोरच संपविण्यात आले. सिद्दिकी यांची ओळख बॉलिवूडमध्ये होती. अनेकांनी सलमानशी घनिष्ट संबंध असल्याने सिद्दिकींना संपविण्यात आल्याची शक्यता वर्तविली आहे.
2 / 9
बाबा सिद्दिकींची इफ्तार पार्टी खूप फेमस होती. या पार्टीत बॉलिवूडच्या बड्या बड्या हस्ती येत होत्या. यात सलमान. शाहरुखही होते. या दोघांचे वैर तर अशाच एका इफ्तार पार्टीत सिद्दिकींनी संपविले होते. सिद्दिकी लक्झरी लाईफस्टाईलमुळे सुद्धा चर्चेत होते.
3 / 9
बाबा सिद्दिकी मुळचे बिहारचे होते. त्यांचा जन्म बिहारचा तर बालपण मुंबईत गेले होते. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार ते १२ वी पास आहेत. बांद्राच्या सेंट एन्स हाय स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांनी एमएके कॉलेजमध्ये बीकॉमसाठी प्रवेशही घेतला होता. परंतू त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले होते.
4 / 9
विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. दोन वेळा नगरसेवक राहिलेले सिद्दिकी १९९९ मध्ये आमदार झाले. यानंतरच्या दोन निवडणुका ते जिंकले. परंतू २०१४ मध्ये ते हरले.
5 / 9
२०१४ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रास सिद्दिकी यांनी ७६ कोटींची संपत्ती जाहीर केली होती. २००९ मध्ये २५ कोटी आणि २००४ मध्ये १२ कोटी रुपये संपत्ती असल्याचे त्यांनी जाहिर केले होते. त्यांच्यावर २३.५९ कोटींचे कर्जही होते.
6 / 9
बाबा सिद्दिकी यांना महागड्या गाड्यांचाही शौक होता, त्यांच्याकडे Mercedes Benz A 180 Sport, पत्नीकडे Mercedes Benz S Class 350 L या कार होत्या. तसेच मीडिया रिपोर्टनुसार बीएमडब्ल्यू 7 सीरीज आणि रोल्स रॉय़सच्या कारही त्यांच्याकडे होत्या.
7 / 9
बाबा सिद्दिकींच्या पत्नीकडे २०१४मध्ये ६ कोटींचे दागिने होते. सिद्दिकींकडे बांद्रामध्ये बांद्रामध्ये ६ कोटींची कमर्शिअल प्रॉपर्टी होती. पत्नीच्या नावे एक कोटीची एक आणि ९१ लाखांची एक अशी प्रॉपर्टी होती.
8 / 9
बाबा सिद्दिकींकडे तेव्हा ३ कोटी आणि १५ कोटींची रहिवासी इमारत होती. तसेच पत्नीच्या नावावर ३ कोटी, ४ कोटी आणि ६ कोटी रुपयांची रेसिडेन्सिअल प्रॉपर्टी होती. कालिनाला देखील तिच्या नावावर ७३ लाखांची संपत्ती होती. या सर्व किंमती २०१४ च्या आहेत. २०२४ मध्ये यात भरमसाठ वाढ झालेली असणार आहे.
9 / 9
बाबा सिद्दिकी यांच्यावर ईडीने देखील धाड टाकली होती. त्यांनी बड्या फिल्मस्टारला एसआरएचे फ्लॅट विकल्याची तक्रार ईडीकडे करण्यात आली होती. यावरून २०१८ मध्ये ईडीने सिद्दिकी यांचे मुंबईतील ३३ फ्लॅटसह ४६२ कोटींची संपत्ती जप्त केली होती. बाबा सिद्दिकी हे गेल्या सहा महिन्यांपर्यंत काँग्रेसमध्ये होते. लोकसभेपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली होती. तर मुलगा हा काँग्रेसमध्येच आमदार असल्याने थांबला होता.
टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस