HMPV विषाणूपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल?; आरोग्य विभागाकडून महत्त्वाच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 20:20 IST
1 / 8जगातील अनेक देशांमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस ( एचएमपीव्ही ) विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. भारतातही या विषाणूचा शिरकाव झाला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.2 / 8राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागानेही खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय श्वसनाचे संसर्ग वाढू नये, यासाठी लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.3 / 8जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवा. 4 / 8आपले हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.5 / 8भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे. संक्रमण कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उदा. शाळा व कार्यालये इ. ठिकाणी हवा खेळती असावी.6 / 8हस्तांदोलन टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळावा. आजारी लोकांशी जवळचा संपर्क नसावा.7 / 8डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.8 / 8डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळावे. सर्दी व खोकला झाल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.