Maharashtra Politics: धनुष्यबाण कुणाचा? शिंदे गट की ठाकरे? निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार! लढाई अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 13:15 IST
1 / 9Maharashtra Politics: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले.2 / 9यातच आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाबाबत निवडणूक आयोग ७ ऑक्टोबर रोजी निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केस सुरू असताना चिन्हाबाबात निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे.3 / 9शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार याचा निर्णय पुढच्या काही तासात होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना ७ ऑक्टोबर रोजी आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. अंधेरीची पोटनिवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे.4 / 9अंधेरी पूर्वच्या जाहीर झालेल्या निवडणूक प्रक्रियेनुसार, ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, त्याची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत असेल. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो, याची उत्सुकता आहे.5 / 9शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची कायदेशीर लढाईबाबत वकिलांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. आयोगात प्राथमिक रिप्लाय कधी सादर करायचा, यावर बैठकीत विचार होणार आहे. आयोगामध्ये प्राथमिक रिप्लाय दिल्यानंतर कागदपत्रे दाखल करण्यासाठी शिवसेना वेळ मागण्याची शक्यता आहे.6 / 9शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून जवळपास सहा ते सात लाख अॅफिडेव्हिट सादर करायचे असल्याने वेळ मिळावा ही विनंती आयोगाला केली जाणार आहे. चिन्हाची केस मुळात आयोगासमोर अजून नीट आलेलीच नाही. 7 / 9अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाची स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा ठाकरे गटाचा दावा आहे.8 / 9शिंदे गटाचा दावा आहे की, विधिमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहोचला आहे. लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असले तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलेही जाण्याची शक्यता आहे.9 / 9दरम्यान, पोलिसांच्या अंदाजित आकडेवारीनुसार मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सुमारे एक लाख शिवसैनिक उपस्थित होते. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीकेसी येथील मैदानात झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दोन लाख शिवसैनिकांची उपस्थिती होती, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.