who is rashmi shukla ips director general of police maharashtra upsc exam
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, कसं आहे रश्मी शुक्लांचं करिअर? By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 3:49 PM1 / 8महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्यावर आरोप करत काँग्रेसने त्यांना डीजीपी पदावरून हटवण्याची मागणी केलीये. फोन टॅपिंग आणि भाजपला मदत केल्याचे आरोप त्यांच्यावर केले गेले आहेत.2 / 8आयपीएस रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत. १९८८ च्या बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी आहेत. ४ जानेवारी २०२४ रोजी त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.3 / 8पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी, त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक होत्या. जून २०२४ मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. पण, सरकारने त्यांना मुदतवाढ दिली. त्यामुळे त्या अजूनही पोलीस महासंचालक आहे.4 / 8महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.5 / 8 वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजेच १९८८ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि आयपीएस अधिकारी बनल्या.6 / 82014 ते 2019 या युती सरकारच्या काळात त्या राज्य गुप्तचर विभाग म्हणजेच सीआयडी विभागाच्या आयुक्त होत्या. 7 / 8त्याचबरोबर केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर त्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक होत्या.8 / 8आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप झाले. त्यांच्यावर नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला. मुंबई आणि पुणे येथे याप्रकरणात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात त्यांना मुंबई उच्च न्यायालयात क्लीन चीट मिळाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications