शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पूजा खेडकरांची ऑडी कार कोणाची? रातोरात बंगल्याच्या आवारातून पजेरोही गायब झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 1:33 PM

1 / 8
हायफाय राहणीमान, ऑडी कार त्यावर अंबर दिवा, महाराष्ट्र सरकारचा स्टीकर यामुळे वादात सापडलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत एकेसोएक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.
2 / 8
काल पोलीस आणि मीडियाला आत टाकण्याची धमकी देणाऱ्या पूजा यांच्या मातोश्रींचा पिस्तूल हातात मिरवत, बाऊंसर्स सोबत घेत शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा व्हिडीओ आला आहे. अशातच पोलीस जी कार तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी गेले होते ती कारच तिथून गायब करण्यात आली आहे.
3 / 8
खेडकरांच्या बंगल्याच्या आवारातील त्या वापरत असलेली अंबर दिवा लावलेली, महाराष्ट्र सरकार लिहिलेली ऑडी कार आज गायब करण्यात आली आहे. खेडकरांची आई मनोरमा यांनी काल नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलीसांना दमदाटी केली होती. तसेच गेट उघडायला नकार दिला होता. यामुळे या ऑडी कारवरील चलनांची नोटीस वाहतूक पोलिसांनी खेडकरांच्या नातेवाईकांना व्हॉट्सअप केली होती. तसेच ती कार पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगितले होते. याबाबतचे वृत्त एबीपीने दिले आहे.
4 / 8
परंतू ही कार आज सकाळीच गायब झाली आहे. याचबरोबर बंगल्याच्या आवारात आणखी एक पजेरो ही हायफाय एसयुव्ही होती. ती देखील गायब झाली आहे. आता या दोन्ही कार रातोरात कुठेतरी दुसरीकडे हलविण्यात आल्या आहेत. यातून पुरावे नष्ट देखील केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
5 / 8
पूजा खेडकर वापरत असलेली ही ऑडी कार थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर आहे. आता या कंपनीचा मालक हा पूजा यांची आई मनोरमा खेडकरांचा माजी सहकारी असल्याचे समोर येत आहे.
6 / 8
एकंदरीत हे प्रकरण आता वाच्यता फुटल्याने दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिल्डर बाळाच्या आईने जसे पुरावे नष्ट केले तसाच प्रकार या प्रकरणात कारवरील पुरावे नष्ट करण्यासाठी केला जात असल्याचा संशय पुणेकरांना येऊ लागला आहे.
7 / 8
पूजा यांनी युपीएससीतून सरकारी नोकरी कशी मिळविली याचेही प्रकार समोर येऊ लागले आहेत. कमी रँकिंग असतानाही डोळे, नजर विकलांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवत स्पेशल कोट्यातून जागा मिळविली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ओबीसी क्रीमी लेयर सर्टिफिकेट देखील खोटेच दिल्याचे समोर येत आहे.
8 / 8
प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच या मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हाट्सअपवर मेसेज पाठवत गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे म्हणत मागणी केली.. जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस शेजारीच मलाही ऑफिस पाहिजे अशी मागणी केली होती.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगPuneपुणेPoliceपोलिसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारias pooja khedkarपूजा खेडकर