शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार? ओपिनियन पोलचा धक्कादायक कल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 9:33 PM

1 / 7
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदेगट-भाजपा आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे.
2 / 7
शिवसेनेतील बंड आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात कोर्टात लढाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात आज निवडणूक झाल्याच मतदार कुणाला कौल देणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. दरम्यान, इंडिया टीव्ही-मॅटराईजच्या ओपिनियन पोलमधून याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
3 / 7
या आकडेवारीनुसार राज्यात आज निवडणूक झाली तर २८८ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजपा पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरेल. मात्र भाजपाला बहुमत मिळणार नाही. भाजपाला १३४ जागा मिळू शकतील.
4 / 7
भाजपाचा मित्र असलेल्या शिंदे गटालाही चांगला जनाधान मिळू शकतो. शिंदे गटाला ४१ जागा मिळू शकतात.
5 / 7
राज्यात आज निवडणूक झाल्यास उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो. त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला केवळ १८ जागांवर समाधान मानावे लागेल.
6 / 7
तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४४, काँग्रेसला ३८ जागा मिळतील. इतरांच्या खात्यात १३ जागा जाऊ शकतात.
7 / 7
दरम्यान, राज्यातील ५४ टक्के मतदारांनी २०२४ मध्ये भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार सत्तेत यावं असा कल नोंदवला. तर ३२ टक्के लोकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आपलं मत दिलं.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस