शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डॉक्टरकडे जाताना जुन्या रिपोर्टची गरज कशाला; 'आभा' हेल्थ कार्ड काढले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 7:45 PM

1 / 9
केंद्र सरकारने आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट आभा अर्थात डिजिटल हेल्थ कार्ड लाँच केले आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविली जाणार आहे. आभा कार्डसाठी नोंदणी करताना आजार व उपचारांची माहिती घेतली जाते.
2 / 9
भारत सरकारद्वारे आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन (एबीडीएम ) राबविले जात आहे. आधार कार्डच्या धर्तीवर देशातील सर्व नागरिकांना डिजिटल आरोग्य ओळखपत्र प्रदान करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
3 / 9
१४ अंकी क्रमांक असलेल्या या युनिक आयडी कार्डमध्ये व्यक्तीचे आजार, उपचार आणि वैद्यकीय चाचण्यांची माहिती नोंदविली जाणार आहे. युनिक आयडी कार्डमुळे डॉक्टरांना रुग्णाची मेडिकल हिस्ट्री समजणे सोपे होणार
4 / 9
काय आहे आभा? - आभा हे हेल्थ डिजिटल कार्ड आहे, त्यामध्ये व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविली जाणार आहे. आभा कार्डमुळे रुग्णाची मेडिकल हिस्ट्री समजणे सोपे होणार आहे.
5 / 9
डॉक्टरकडे जाताना जुन्या रिपोर्टची गरज कशाला? - कार्डमध्ये व्यक्तीच्या आरोग्याची सविस्तर माहिती नोंदविली जाणार आहे. आजार, उपचार व वैद्यकीय चाचण्यांचा त्यात समावेश असेल. त्यामुळे जुन्या रिपोर्टची आवश्यकता भासणार नाही.
6 / 9
कार्डवर १४ अंकी क्रमांक - आभा कार्डधारकांना १४ अंकी क्रमांक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची आरोग्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. आभा कार्डमुळे बाहेरील शहरातही उपचार घेणे सोपे होणार आहे.
7 / 9
नोंदणी सुरु - आभा कार्ड काढण्यासाठी जनआरोग्य योजना कार्यालयाने रुग्णालये व शासकीय कार्याल- यांमध्ये नोंदणी सुरु केली आहे. माहिती घेऊन आभा कार्ड डाऊनलोड केले जात आहे. त्यामुळे नोंदणी संख्या नाही
8 / 9
कार्ड कसे काढाल? - आभा कार्ड काढण्यासाठी ndhm.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. 'क्रिएट हेल्थ आयडी यावर क्लिक करावे. आधारकार्ड व मोबाइल नंबर टाकल्यास मोबाइलवर ओटीपी येईल व कार्ड जनरेट होईल.
9 / 9
आभा हेल्थ कार्डमध्ये रुग्णाची वैद्यकीय माहिती नोंदविली जाणार आहे. तसेच रुग्णालये व डॉक्टरांना एका सर्व्हरशी जोडले जाणार आहे. आभा कार्ड काढण्यासाठी नोंदणी केंद्रे सुरू केली आहेत. नागरिकांनी लाभ घ्यावा असं जन आरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
टॅग्स :Healthआरोग्य