Will Narayan Rane succeed in the second round of political career?
नारायण राणे राजकीय कारकीर्दीतील दुस-या बंडात यशस्वी होतील का ? By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 5:30 PM1 / 9नारायण राणे यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजकीय कारकीर्दीतील नारायण राणे यांचे हे दुसरे बंड आहे.2 / 9स्थानिक शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास करणा-या नारायण राणेंची महत्वकांक्षी आणि आक्रमक नेते अशी ओळख आहे. 3 / 91968 साली शिवसेनेने त्यांच्याकडे चेंबूरच्या शाखाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांनी झोकून देऊन काम केले आणि चेंबूर विभागात शिवसेना वाढवली. 4 / 91985 साली त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले. चेंबूरच्या कोपरगावमधून ते महापालिकेवर निवडून गेले. 5 / 91990 साली राणेंना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. विधानसभेची निवडणूकही राणेंनी जिंकली. 1991 साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर शिवसेनेत नारायण राणे यांचे महत्व वाढू लागले. 6 / 9 3 जुलै 2005 रोजी शिवसेनेतून हाकलपट्टी झाल्यानंतर नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी कणकवलीत झालेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंसमोर शिवसेना उमेदवार परशुराम उपकरांचे डिपॉझिट जप्त झाले. 7 / 92008 मध्ये विलासराव देशमुखांच्या जागी अशोक चव्हाणांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. राणेंनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद मिळवण्याचे भरपूर प्रयत्न केले. पण त्यात यशस्वी झाले नाहीत. 8 / 92014 मध्ये कुडाळ या त्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर राणे सातत्याने स्वपक्षीयांवरच टीका करत होते. 9 / 9 काँग्रेसने राणेंना विधानपरिषदेवर पाठवले. पण तरीही त्यांची नाराजी, अस्वस्थतता दूर झाली नाही.अखेर या सर्व नाराजीतून 21 सप्टेंबर 2017 रोजी राणेंनी काँग्रेसच्या आमदारकीसह पदाचा राजीनामा दिला. आणखी वाचा Subscribe to Notifications