woman infected with corona from Somaiya Hospital fled to Raigad with her husband mac
मुंबईतील कोरोनाबाधित महिलेने पतीसोबत रुग्णालयातून काढला पळ; रायगडमध्ये पोहचली अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 6:58 PM1 / 7राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मंगळवारी तब्बल २१२७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७,१३६ वर पोहचली आहे. तर १३२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.2 / 7 कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. मात्र तरीदेखील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 3 / 7तसेच अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढताना दिसून येत आहे. कोरोनावर मात करायची असेल तर प्रशासन, पोलीस, रुग्णालमधील नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण उपचारादरम्यान रुग्णालयातून पळून जात आहे. 4 / 7 मुंबईतील सोमय्या रुग्णालयात देखील असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कोरोनाची लागण झालेल्या महिलेने रुग्णलयातून पळ काढत पतीसह गावी गेल्याचा प्रकार समोर आला आहे.5 / 7 सोमय्या रुग्णालयात उपचार सुरु असताना संबंधित कोरोनाबाधित महिलेला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या संधीचा फायदा घेत महिलेने रुग्णालयातून पळ काढला. 6 / 7 संबंधित महिला आपल्या पतीसह रायगडमधील करमर गावात दाखल झाली. मात्र तिथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांची कागदपत्र तपासली असता ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. 7 / 7यानंतर पोलिसांनी तात्काळ पती आणि पत्नीला महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच दोघांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती देखील स्थानिक पोलिसांनी दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications