World Photography Day: Do you know 'Hey' scenic tourist destination in Maharashtra?
World Photography Day: महाराष्ट्रातील 'हे' निसर्गरम्य पर्यटनस्थळ माहितीयं का? By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 3:00 PM1 / 11 आज वर्ल्ड फोटोग्रामी डे आहे, त्यानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची काही छायाचित्र आपणाला दाखवत आहोत. निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तूंना नटलेला महाराष्ट्र पाहा. 2 / 11औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या अंजंठा आणि वेरुळच्या लेणी पाहायला दूर-दूरहून पर्यटक येतात. विदेशी पर्यटकही येथील लेण्याना पाहून फोटो काढून नेतात. 3 / 11अजिंठा आणि वेरूळ लेणी या एकाच दगडात कोरून बनवण्यात आलेल्या प्राचीन लेण्यांपैकी एक आहेत.4 / 11 महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे आर्थिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठं शहर असून पर्यटनासाठीही येथे गर्दी होते. मुंबईचं सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि मुंबई महापालिका हेही पर्यटनाचंच ठिकाण मानलं जातं5 / 11ढगाळ वातावरण, नैसर्गिक तलावांत खेळण्याचा आनंद, हनुमान मंदिरात शांतता आणि प्रसन्नता शोधणे, चित्तथरारक दृश्ये, घनदाट जंगले, फेसाळते धबधबे आणि पावसाळा. त्रिंगलवाडी किल्ल्यावरील ट्रेकला या सर्व गोष्टींचा अनुभव घ्या.6 / 11अंजठा वेरुल लेणीतील ऐतिहासिक वास्तूचं हे ठिकाण आहे, या वास्तूला आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा देण्यात आला आहे7 / 11पावसाळ्यात चहा, कुंद वातावरण आणि काही मनमोहक दृश्ये देवकुंड धबधब्यावरील हे क्षण कसे असतील.8 / 11अंजनेरी टेकडी इतर लोकप्रिय ट्रेकिंग स्थळांपासून वेगळी आहे कारण या टेकडीचा रामायणाची संबंध आहे.9 / 11साहसीप्रेमींसाठीच नव्हे तर आध्यात्मिक तीर्थक्षेत्राची आवड असणाऱ्या रसिकांसाठी देखील ही टेकडी लोकप्रिय आहे. 10 / 11मालवण येथील लोकप्रिय तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरील साहसी खेळांचा अनुभव म्हणजे प्रत्येक समुद्रप्रेमींसाठी एक स्वर्गच जणू.11 / 11 येथे वॉटर स्पोर्ट्सपासून डॉल्फिन सफारी आणि डॉल्फिन पाहण्याच्या जादुई अनुभव, सर्व काही या समुद्रकिनाऱ्यावर आहे. महाराष्ट्र टुरिझमच्या अधिकृत ट्विटरवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications