You come in the rain, 'Who has the rain?'
तु ये रे पावसा, 'गेला पाऊस कुणीकडे'... By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 9:55 PM1 / 8राज्यातील १०९ लाख ८२ हजार हेक्टरवरील पेरण्या झाल्या असल्या तरी पुरेसा पाऊस न झाल्याने मोठ्या प्रमाणातील क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत. 2 / 8राज्यात १ ते २२ जुलै या कालावधीत सरासरी ५०९ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ३८६.६० (७५.३६ टक्के) इतका झाला आहे. 3 / 8विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. 4 / 8आभाळ पांढरफट्ट पडलं आहे, पावसाचा लवलेशही नाही तर हवामान खात्याचा अंदाजही फोल ठरतोय. 5 / 8 पाऊस नसल्याने गेला पाऊस कुणीकडे अशी म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठाही ठप्प झाल्या आहेत. 6 / 8मुंबईसह कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. मात्र, मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांच्या गावाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. म्हणूनच फोनवर आई-वडिलांशी बोलताना उत्तर माहिती असूनही पाऊस-पाणी कसंय विचारताना शब्द जड होतात.7 / 8आभाळात काळे ढग साचतात तेव्हा बळीराजा सुखावतो, वरुण राजाची कृपीदृष्टी होईल असे वाटून आनंदित होतो. पण, काही वेळातच हे काळे ढग नाहीसे होतात.8 / 8अमरावतीमध्ये कपाशीच्या पिकाला चक्क विकतचं थेंब थेंब पाणी आणून शेतकऱ्याने दिलंय. अगदी काळीज हेवालणार हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय. आणखी वाचा Subscribe to Notifications