Zika virus infects 7-year-old Maharashtra girl; Check symptoms, treatment of Zika virus
Zika Virus: कोरोनापाठोपाठ आता राज्यात झिका व्हायरसचा धोका, वेळीच जाणून घ्या लक्षणं By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 5:50 PM1 / 10राज्यात कोरोनाची प्रकरणं वाढत असतानाच आता झिका व्हायरसचं संकट आलं आहे. वर्षभरानंतर पुन्हा झिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे.2 / 10पालघर जिल्ह्यातील जोई येथील आश्रमशाळेतील 7 वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाली आहे. गेल्या वर्षी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर (belasar) येथे 50 वर्षांच्या महिलेला झिका व्हायरसची लागण झाली होती.3 / 10झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलात राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला.4 / 101950 पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला,. 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं.5 / 10झिका विषाणूवर अद्याप औषध नाही; मात्र इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन (Inactivated Vaccine) विकसित करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिले आहेत.6 / 10मार्च 2016 पासून जगभरातल्या 18 औषध कंपन्या या लसनिर्मितीचं संशोधन करत आहेत. यासाठी 10 वर्षं लागू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे.7 / 10काही लशींच्या चाचण्या झाल्या असल्या, तरी अद्याप कोणत्याच लशीला मंजुरी नाही आणि उत्पादनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे हा संसर्ग अधिक धोकादायक आहे.8 / 10झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं.9 / 10ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.10 / 10झिका विषाणूमुळे जन्मजात दोष उद्भवतात. गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं. You आणखी वाचा Subscribe to Notifications