Here are 8 Reasons for Divorce in Modern Times, Shocking Information Revealed by Survey
Divorce: ही आहेत, सध्याच्या काळातील घटस्फोटाची ८ कारणे, सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 2:10 PM1 / 9लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. पण त्या सुटायला किवा तुटायला क्षुल्लक वाटावे, असे एखादे कारणही पुरेसे होते. याचाच प्रत्यय गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या घटस्फोटांच्या वाढत्या संख्येतून येत आहे. घटस्फोटांची केवळ संख्याच वाढत नाहीये तर त्यासाठी दिल्या जाणाऱ्या नित्याच्या कारणांतही आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत चित्रविचित्र कारणांमुळे झालेल्या घटस्फोटांची जंत्री एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.2 / 9दीड महिना सकाळचा पहिला चहा पत्नीने करून दिला नाही तसेच मित्र आल्यानंतर देखील चहा करण्यास नकार दिला, त्यामुळे अपमान झाला या कारणास्तव एका व्यक्तीने घटस्फोट घेतला. 3 / 9प्रेम विवाह केलेल्या एका मुलाने लग्नानंतर आपण मांसाहार करणार नसल्याचे सांगितले. मात्र, तरीही त्याला मांसाहाराची इच्छा अनावर झाल्याने त्याने अनेक रात्री मित्रांकडे राहत मांसाहार केल्याचे पत्नीला समजले. पत्नीने फसवणूक झाल्याचे सांगत घटस्फोट घेतला. 4 / 9पत्नीचे वजन वाढले आणि तिचे शरीर बेढब दिसू लागले. अनेकवेळा सांगूनही तिने त्यासंदर्भात काहीच केले नाही त्यामुळे मानसिक त्रास झाल्याचे सांगत एका पतीने काडीमोड घेतला. 5 / 9आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव पत्नीच्या हाताला नाही. यामुळे जेवणाचा भ्रमनिरास होत असल्याचे सांगत एक जण पत्नीपासून विभक्त झाला. 6 / 9पत्नीच्या गालावर अनेक पिंपल्स आहे. त्यामुळे मला मानसिक त्रास होतो. ती नकोशी वाटतेय, या कारणास्तव ही एकाचा घटस्फोट झाला आहे. 7 / 9करवाँ चौथला पतीच्या पायाला स्पर्श करून नमस्कार न केल्यामुळे अनादर झाल्याच्या भावनेतून वितंडवाद झाल्यानंतर एका पतीने घटस्फोट घेतला. 8 / 9 नवऱ्याला मी खूप आवडते आणि तो कधीच भांडत नाही. कधीच विरोध करत नाही. पत्नीचे सर्वच त्याला पटते, यामुळे वैताग होत असल्याच्या भावनेतून एक महिला पतीपासून विभक्त झाली. 9 / 9लग्नापूर्वीचे घर मोठे होते. लग्नानंतर लहान घरात राहावे लागत आहे. मोठ्या घरासाठी नवरा काहीच करत नाही या कारणास्तव देखील घटस्फोट झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications