Photo: सावरकरांमध्ये दिसले "हिंदुहृदयसम्राट" बाळासाहेब ठाकरे By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 06:09 PM 2022-11-17T18:09:15+5:30 2022-11-17T18:49:10+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच गदारोळ माजला असून भाजपासह शिंदे गटही आक्रमक झाला आहे. शिंदे गटाकडून राहुल गांधींवर टीका होतेय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच गदारोळ माजला असून भाजपासह शिंदे गटही आक्रमक झाला आहे. शिंदे गटाकडून राहुल गांधींवर टीका होतेय.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन असून राहुल गांधींनीही भारत जोडो यात्रेतून बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. मात्र, सावरकरांबद्दल त्यांनी केलेल्या विधानावरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे.
राहुल गांधींच्या विधानाला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांची महती सांगितली. तसेच, राहुल गांधींना सावकरांचा इतिहास माहिती नसून ते अपप्रचार करत असल्याचंही ते म्हणाले.
'काँग्रेसच्या वतीने सावरकरांबद्दल रोज खोटं बोललं जात आहे. स्वातंत्र्य लढ्यात असलेल्या सर्वांचा मला आदर आहे. पण अत्याचार सहन करणारा सावरकारांसारखा एक नेता दाखवा.
अंदमानमध्ये सावरकर गेले नसते, तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती किंवा ते वेडे झाले असते. राहुल गांधी यांना सावरकरांचा स देखील माहीत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरीता, 'वारसा विचारांचा' या कार्यक्रमाचे मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, दादर येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी, हिंदुह्रदयसम्राट म्हणून स्वातंत्र्यवीर सावकर यांचाही फोटो दोन्ही नेत्यांनी दाखवला.
या कार्यक्रमात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत सावरकर यांची एकच प्रतिमा रेखाटण्यात आली होती. त्यावरही, हिंदुह्रदयसम्राट असे नाव लिहिले होते. त्यामध्ये, सावरकरांच्या फोटोतच बाळासाहेबही दिसून येतात.