Photos : नेत्यांची कडक एन्ट्री, शिवरायांचं दर्शन अन् विरोधकांची घोषणाबाजी By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:24 PM 2021-12-22T12:24:54+5:30 2021-12-22T12:48:33+5:30
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसासाठी राजकीय मंडळींनी कडक एन्ट्री पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन परिसरात दमदार एन्ट्री झाल्याचे फोटो त्यांनीच ट्विट केले आहेत. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का, याबातत राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विधिमंडळाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांना योग्य वाटेल तेव्हा योग्य वेळी ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसासाठी राजकीय मंडळींनी कडक एन्ट्री पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन परिसरात दमदार एन्ट्री झाल्याचे फोटो त्यांनीच ट्विट केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदे घेऊन राज्य सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे. तर, चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कारही घालण्यात आला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे कडक एंट्री केली, रेड कार्पेटवरुन त्यांनी विधीमंडळ सभागृहाकडे वाटचाल केली.
मुख्यमंत्री सध्या अधिवेशनात आले नाहीत, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन चर्चा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधीमंडळ सभागृहात मंत्री आणि सदस्यांशी वार्तालाप केला.
महाविकास आघाडी सरकारचे सर्वच मंत्री आणि आमदार या वार्तालाप बैठकीला उपस्थिते होते, अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विरोधी पक्षांतील आमदारांनी पायरीवरु बसून सरकारचा निषेध नोंदवला. तसेच, राज्यातील विविध प्रश्नांकडे लक्षही वेधले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री यांनी विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषही करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती यावेळी दिसून आली.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले