Photos : पेट्रोल दरवाढीचा निषेध, काँग्रेस मंत्र्यांनी सायकलवरुन गाठलं विधिमंडळ By महेश गलांडे | Published: March 1, 2021 11:52 AM 2021-03-01T11:52:45+5:30 2021-03-01T12:23:22+5:30
केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढल्याचे सांगत काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदारांनी महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिनव आंदोलन केले. सायकलवरुन विधिमंडळात जात इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. मोदी सरकारने जनतेवर लादलेल्या अन्यायकारक इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेस मंत्री व आमदार सायकल चालवत विधानभवनात पोहोचले. मोदी सरकारने तत्काळ इंधन दरवाढ मागे घेऊन जनभावनेचा आदर करावा व जनतेची लूट थांबवावी, अशी मागणीही केली.
इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच ई वे बिलमुळे वाहतूकदारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे
इंधन दरवाढ आणि महागाई याचा थेट संबंध आहे. कोणतीही वस्तू असो, फळे, भाज्या, धान्य किंवा कपडे असाेत. प्रत्येक गोष्टीसाठी वाहतूक आवश्यक आहे. वाहतूक क्षेत्राचा कच्चा माल डिझेल आहे.
वाहतूक व्यवसायात गाड्यांच्या ६० टक्के खर्च डिझेलचा असतो. डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इतकेच नव्हे तर दरवाढीची मर्यादा ओलांडली गेली आहे. यामुळे डिझेल आणखी महाग होते. त्याचा वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो. या वस्तूंचे भाव वाढतात.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा थेट सर्वसामान्यांना फटका बसतो, त्यामुळे महागाई वाढते. म्हणून काँग्रेस नेत्यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सायकलवरुन विधिमंडळ गाठले
काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पुढाकार घेऊन सायकल चालवत पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार स्विकारल्यापासूनचे ते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. मोदी सरकारवर विविध माध्यमातून ते टीका करत आहेत.
मंत्री विश्वजीत कदम हेही सायकल रॅलीत सहभागी झाले होते, त्यांच्यापाठिमागे पोलीस आणि सुरक्षा रक्षक धावताना दिसत आहेत.
विश्वजीत कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सायकलवरुन विधिमंडळात जात असल्याचे फोटो शेअर केले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचेही विधिमंडळात आगमन झाले, त्यावेळी अनेक मंत्र्यांचा फोजफाटा त्यांच्यासमवेत होता.
विधिमंडळात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन सभागृहात प्रवेश केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम व अनेक आमदारांनी सायकल चालवून निषेध नोंदवला.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही या सायकल रॅलीत सहभाग घेतला होता.