'शिंदे'ताईंचा वर्ल्ड रेकॉर्ड, 75 दिवसांत साकारला महाराजांचा अश्वारुढ पुतळा By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:16 PM 2022-06-22T17:16:22+5:30 2022-06-22T17:43:15+5:30
खा. कोल्हेंच्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत असून त्यावर कलाकारी करताना सुप्रिया शिंदेही दिसत आहेत. या फोटोत पुतळ्याची निर्मितीचे सुरुवातीचे फोटो आहेत. राज्यात एकीकडे एकनाथ शिंदे या नावाने राजकीय धुरळा उडवून दिला आहे. शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदेंनी 30 ते 35 आमदारांसह सूरत गाठले.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदेशाही निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात रंगली असताना, मंचरच्या शिंदेकन्येनं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय.
मावळ मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट करुन सुप्रिया शिंदे यांनी बनविलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, त्यांच्या रेकॉर्डबद्दलही माहिती दिली आहे.
आपल्या मंचरच्या सुप्रियाताई शिंदे यांनी रोज १४ तास काम करून ७५ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मेटलमध्ये बनवून 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया' मध्ये आपलं नाव नोंदवल.
सुप्रिया शिंदेंच मनापासून अभिनंदन! लोकनेते किसनराव बाणखेले यांचा मंचर येथील पुतळाही त्यांनीच तयार केला आहे. सुप्रियाताई, माझ्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत!, अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.
खा. कोल्हेंच्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत असून त्यावर कलाकारी करताना सुप्रिया शिंदेही दिसत आहेत. या फोटोत पुतळ्याची निर्मितीचे सुरुवातीचे फोटो आहेत.
तसेच, महाराजांचा पुतळा बनवून पूर्ण झाल्यानंतर तो मेटलमध्ये बनल्यानंतरचाही फोटो शेअर करण्यात आला आहे. महाराजांचा हा पुतळा भारदस्त दिसून येतो.