Amruta Fadavis: अमृता फडणवीसांची निर्दोष मुक्तता, सांगतिलं कोणाला घाबरतात By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 2:59 PM1 / 10 अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था,नागपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अभिरुप न्यायालयात’ गायिका अमृता फडणवीस या आरोपी म्हणून प्रस्तुत झाल्या होत्या, यावेळी सर्व आरोपांचे खंडन करण्यात यशस्वी झाल्या. 2 / 10अभिरुप न्यायालयाचे न्यायमूर्ती कुसुम सिरपूरकर यांनी त्यांना 'बा इज्जत बरी 'केलं . ह्या कार्यक्रमात भाग घेऊन मला वेगळाच आनंद अनुभवता आला, असं अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. तसेच, कार्यक्रमाचे फोटोही शेअर केले आहेत. 3 / 10मंगळवारी श्रीसाई सभागृह येथे अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीने आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर देत होत्या. 4 / 10 आरोप करणारे जनतेचे वकील अजेय गंपावार होते तर न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायमूर्ती म्हणून ॲड. कुमकुम सिरपूरकर होत्या. लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी जबाबदारी पार पाडली.5 / 10माझे स्वत:चे स्वतंत्र विचार आहेत आणि ते व्यक्त होणे मला आवडते. त्याचा कधी मला तर कधी देवेंद्र फडणवीस यांना तोटा सहन करावा लागतो आणि त्यामुळे मी आता किमान व्यक्त होत आहे. मात्र, घाबरत मुळीच नाही. 6 / 10मला ट्रोल करणारे ट्रोलर्स प्रचंड क्रिएटिव्ह आहेत आणि त्यांच्याकडे बराच वेळ असतो. मात्र, ते सारेच महाविकास आघाडीने पाच पैसे देऊन ट्विटरवर धाडलेले सैन्य आहेत. 7 / 10मी माझ्या आईंना (सासूबाई) सोडून कुणालाच घाबरत नसल्याच्या भावना अमृता देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे व्यक्त केल्या.8 / 10आपल्या वक्तव्यांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली होती, हे खरे आहे. मात्र, हे तक्रारदार स्वत: त्यांच्या घरातील स्त्रियांबाबत उदासीन आहेत. 9 / 10आदित्य ठाकरे यांनी देवेंद्रजींना स्त्री अत्याचारी व प्रतिगामी असल्याचे म्हटले तेव्हा माझा तिळपापड उडाला होता आणि म्हणूनच मी त्यांना रेशमाचा किडा म्हणून संबोधले होते. कारण, देवेंद्रजी परिश्रमाने वर आले तर ते कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे. 10 / 10आपणास राजकारणात सध्यातरी रस नाही. आपली प्राथमिकता मुलगी दिविजा आहे. भविष्यात राजकारणात येईल की नाही, हे आत्ताच सांगू शकत नाही. मी गायिका आहे आणि लहानपणापासून आजी, वडील व इतर गुरूंकडून गाणे शिकते आहे. त्यामुळे मी गाते, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications