Calcutta is going for a walk, then eat it and watch it ...
कोलकाता फिरायला जाताय, मग हे खा अन् ते पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 3:36 PM1 / 9कोलकाताच्या मार्केटमध्ये तुम्हाला बाम्बू, ज्यूट आणि पुटूलपासून बनविण्यात आलेले प्रोडक्ट खरेदी करता येतील. 2 / 9कोलकाता फिरायला गेल्यानंतर तेथील प्रसिद्ध रोसगुल्ला तर बनतोच बॉस. येथील संदेश रसगुल्ला फेमस आहे. 3 / 9कोलकात्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आणि आकर्षक बांगड्याही खरेदी करता येतील. येथील बांगड्या जगप्रसिद्ध असून बहुतांश चित्रपटात अभिनेत्रींच्या पोशाखात येथील कोंच शेल बांगड्या दिसतात. 4 / 9कालीघाटच्या भन्नाट पेटींग्ज तुमचं लक्ष वेधून घेतात. येथील पेंटीग्जमध्ये देवी-देवतांची चित्रे पाहायला मिळतात. अमेरिका आणि युरोपमध्ये या पेंटीग्ज प्रसिद्ध आहेत. 5 / 9आता कोलकाता येथे जाऊन तेथील साडी नाही विकत घेतली तर मग तुमची शॉपिंग अपूर्णच. येथील साड्या म्हणजे स्त्रीच्या सुंदरतेवर साज चढविणारा पोशाख. 6 / 9क्रिएटीव्हिटीमध्ये बंगालला तोडच नाही. मिस्टीकल क्राफ्टच्या सुंदर कलाकृती तुम्हाला आकर्षित करतात. भिंतीवर अडकविण्यासाठी या टेबलवर ठेवण्यासाठी कलाकृती उत्तमच. 7 / 9शोलापीठ हँडीक्राफ्टसाठीही हे शहर प्रसिद्ध आहे, दुर्गापूजेसाठी बनविण्यात येणाऱ्या सुंदर मुर्ती आणि पंडाल हे येथील खासियत आहे. 8 / 9भारतीय व्यक्ती जगभरात कुठेही जाऊ देत, तेथील चहा प्यायलाच पाहिजे. कोलकाता फिरायला गेल्यावर दार्जिलिंग टी चा स्वाद घ्यायलाच पाहिजे. 9 / 9टेराकोटा झुंबर आणि लघुमूर्तींची खरेदी करण्यासाठी बनकरा आणि बिष्णुपूरू हे प्रसिद्ध ठिकाण आहे. घरावरील छतावर लावल्यानंतर हे टेरोकाटा घराची शोभा वाढवते. आणखी वाचा Subscribe to Notifications