Eknath Shinde: शिंंदेंना रिक्षावाला म्हणून हिनवलं, फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना सुनावलं By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 9:41 PM1 / 10राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकारनं यश प्राप्त केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली. विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. 2 / 10याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी देखील रोखठोक भाषण केलं आहे. 'शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल पण मागे हटणार नाही' असं म्हटलं. 3 / 10तसेच अन्यायाविरुद्ध बंड करणं ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचंही ते म्हणाले. आपण बंड केला नसून उठाव केल्याचं सांगत फडणवीस-शिंदे मिळून 200 आमदार निवडून आणतील, असेही ते म्हणाले. 4 / 10एकनाथ शिंदेंच्या भाषणाची सोशल मीडियामुळे सर्वत्र चर्चा झाली. अनेकांनी शिदेंच्या भाषणाचं कौतुक करत त्यांना दाद दिली. त्यावरून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर रिक्षावाला म्हणत टीका केली.5 / 10'काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता'' असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंना लगावला होता. त्याला आता मुख्यमंत्र्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 6 / 10'रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला' असं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 'रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच MaharashtraFirst हा हॅश'रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला' असं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 'रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच MaharashtraFirst हा हॅशटॅग देखील वापरला आहे. टॅग देखील वापरला आहे. 7 / 10विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंवरील रिक्षावाला या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरमधील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 8 / 10काँग्रेसने मोदीजींना चायवाला म्हणून हिणवले, त्याच आमच्या पंतप्रधानांनी आज काँग्रेसला पाणी पाजले आहे. त्यामुळे कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता पलटवार केला. 9 / 10सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले नाही, तर सामान्य माणूसच राज्य करेल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनावर फडणवीसांनी निशाणा साधला. 10 / 10दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत आणखी वाचा Subscribe to Notifications