शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आंतरराष्ट्रीय सफरचंद खाण्याचा दिवस; जाणून घ्या या राजेशाही फळाबाबतच्या आश्चर्यजनक बाबी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 7:00 AM

1 / 7
संपूर्ण जगात सफरचंदाच्या ७५०० हून अधिक जाती आहेत. सफरचंद हे गुलाबाच्या फॅमिलीत मोडणारे फळ आहे
2 / 7
सफरचंदांचा आकार हा एका लहानशा चेरी टोमॅटोपेक्षाही लहान आणि एका मोठ्या मोसंबीहून मोठा असू शकतो.
3 / 7
सफरचंदात असलेल्या २५ टक्के पाण्यामुळे ते पाण्यावर तरंगते.
4 / 7
गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डच्या अनुसार, सफरचंदाची सर्वात मोठी साल ही १७२ फूट व चार इंच लांबीची होती. ती काढणाऱ्या व बक्षिस जिंकणाऱ्या कॅथी वॉफ्लर मॅडिसन यांनी ती १६ ऑक्टोबर १९७६ साली काढली होती.
5 / 7
ज्याला जीवनदायी फळ म्हणतात त्या सफरचंदातील बिया मात्र तुमचा जीव धोक्यात घालू शकतात.
6 / 7
सफरचंदाच्या झाडात असलेल्या एका विशेष गुणधर्मामुळे त्यातील बियांमुळे एक नव्या पद्धतीची जाती उत्पन्न होते. त्यामुळे आज सफरचंदाच्या हजारो जाती उपलब्ध आहेत. तुम्ही या सर्व जातींची सफरचंदे खाण्याचे ठरवले तर तुमचे पाव आयुष्य त्यात निघून जाईल.
7 / 7
अमेरिकेत सफरचंद हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ आहे. सफरचंदांच्या उत्तम जातींमध्ये अमेरिकेत गाला, रेड डेलिशियस, ग्रॅनी स्मिथ, फुजी, गोल्डन डिलिशियस, हनीक्रिस्प, रोम, क्रिप्स पिंक, एम्पायर आणि मीन्टोच या जाती मोडतात.
टॅग्स :fruitsफळे