1 / 6केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या सक्रियतेसाठी आणि महामार्गांच्या कामांसाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र सध्या त्यांच्यापेक्षाही त्यांचा नातू निनाद याचीच चर्चा अधिक होत आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.2 / 6नितीन गडकरी यांचा नातू निनाद यांचा उपनयन सोहळा रविवारी पार पडला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होते. उपनयन सोहळ्यानंतर निनादने राजनाथ सिंह यांना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.3 / 6यावेळी राजनाथ सिंह यांना साष्टांग प्रणाम करणाऱ्या आणि पारंपरिक पोशाखात दिसणाऱ्या निनादचे जबरदस्त कौतुक होत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर युजर्स निनादच्या संस्काराचे कौतुक करत आहेत.4 / 6निनादच्या या फोटोंवर सोशल मीडिया युजर्सच्या प्रतिक्रियाही येत आहेत. एकाने लिहिले, संस्कारातूनच कुटुंबाची ओळख होते. एकाने लिहिले, असे संस्कार सर्वच मुलांवर व्हायरला हवेत. एकाने लिहिले, असे केवळ भारतातच होऊ शकते. आणखी एकाने लिहिले, की मुलाचे पाय पाळण्यातच दिसतात, सुंदर दृष्य. अशा पद्धतीने सोशल मीडियावरून निनादवर कौतुकाचा जबरदस्त वर्षाव होत आहे. 5 / 6रविवारीच नितिन गडकरी यांच्या पत्नीचा वाढदिवसही होता.6 / 6हे फोटो नितिन गडकरी यांच्या ऑफिस अकाउंटवर शेअर करण्यात आले यानंतर थोड्याच वेळात ते व्हायरल झाले.