शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sanjay Raut: संजय राऊतांवरही गुन्हा दाखल करा, मनसे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 1:46 PM

1 / 8
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आता ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाण्यात झालेल्या सभेवेळी राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती.
2 / 8
त्यामुळे राज ठाकरेंविरोधात भारतीय दंडविधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा येथील पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यासह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
3 / 8
आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नागपूर येथील एका कार्यक्रमात तलवार हातात घेऊन गुन्हा केल्याची बोललं जात आहे. त्यामुळे, खासदार संजय राऊत यांच्यावरही आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
4 / 8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात जसं आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्याचं प्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा वर्ति गुन्हा दाखल करा.
5 / 8
शिवसेना खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांचे नागपुरात अनेक ठिकाणी कार्यक्रम शिवसेनेच्यावतीने घेतल्या जात आहे.
6 / 8
21 तारखेला राऊत यांच्या एका कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार भेट म्हणून दिली आणि ती तलवार राऊत यांनी उंच करत कार्यकर्त्यांना दाखविली.
7 / 8
नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात आज निवेदन दिलं. राऊतांवरती आर्म ऍक्ट नुसार कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
8 / 8
विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतMNSमनसेnagpurनागपूर