Sensitive Home Minister, Anil Deshmukh will donate the daughter of orphan 'Varsha'
संवेदनशील गृहमंत्री, रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या 'वर्षा'चं कन्यादान करणार अनिल देशमुख By महेश गलांडे | Published: December 09, 2020 12:32 PM1 / 9 गृहमंत्री अनिल देशमुख हे संवदेनशील असल्याचा प्रत्यय वारंवार दिसून आला आहे. आपल्या पोलीस दलातील सहकाऱ्यांचा नेहमीच ते आदर करतात. 2 / 9 लॉकडाऊन काळात दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांचा अनिल देशमुख यांनी घरी जाऊन सन्मान केला, तर अनेकांच्या कुटुंबीयांशीही फोनवरुन संवाद साधला.3 / 9काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वाहतूक पोलिसाला करण्यात आलेल्या मारहाणीनंतर त्या पोलीस शिपायाचा सन्मान करत आपण त्यांच्या पाठिशी असल्याचा संदेश दिला. 4 / 9कोरोना कालावधीत मृत्युमुखी पडलेल्या पोलीस शिपायांपासून ते अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी सांत्वन करत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 5 / 9आता गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी एका अनाथ मुलीचं कन्यादान करणार असल्याचं सांगितलं आहे. २४ वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर मिळालेल्या वर्षा नावाच्या अनाथ मुलीला दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आश्रयदाते श्री.शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या आश्रमात दाखल केले होते. 6 / 9अनिल देशमुख हे कायम शंकरबाबांच्या आश्रमात भेट द्यायचे, तेव्हा वर्षाला त्यांनी दत्तक घेतलं होतं. येत्या २० तारखेला नागपूर येथे वर्षाप्रमाणेच मुंबईच्या स्टेशनवर मिळालेल्या एका मुलासोबतच तिचा विवाह करण्याचे आयोजिले आहे. 7 / 9अनिल देशमुख स्वतः वर्षाचे कन्यादान करणार आहे. यानिमित्ताने त्यानिमित्त शंकरबाबा पापळकर यांच्यासह अनिल देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना या विवाहाचे निमंत्रण दिले. 8 / 9शंकरबाबा वर्षासारख्या शेकडो अनाथ मुलींचा सांभाळ करतात, या मुलींचे पालन-पोषण आणि शिक्षण झाल्यानंतर ते आई-वडिलांच्या मायेनं मुलींचे लग्न लावून देतात. तसेच लग्न वर्षाचं लागणार आहे. 9 / 9वर्षाच्या या लग्नाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे, तर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख कन्यादान करणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications