शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

... तरीही माझी धडपड सुरुच राहिल, तुकाराम मुढेंची काळजीवाहू पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 11:25 AM

1 / 12
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसत नसली, तरी आमचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
2 / 12
त्यामुळे नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. गेल्या १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन मुंढेंनी केलं आहे.
3 / 12
कोरोनाच्या संक्रमण काळात यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करताना अनेकांच्या संपर्कात आलो. काळजी म्हणून काही वेळा कोरोना चाचणी केली. मात्र काल केलेल्या चाचणीत 'पॉझिटिव्ह' आलो.
4 / 12
लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आल्याने नियमानुसार 'गृह विलगीकरणा'त (Home Isolation) आहे. मागील 14 दिवसात जे माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वतःची चाचणी अवश्य करून घ्यावी.
5 / 12
मागील साडे पाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. लॉकडाऊन, मिशन बिगीन अगेन या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण थांबविण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला.
6 / 12
या साडे पाच महिन्याच्या काळात प्रत्येक कोरोना वॉरियर्सने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी निकराचा लढा दिला. आजही देत आहेत. स्थानिक प्रशासन म्हणून नागपूर महानगरपालिका आजही झटत आहे. वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहे.
7 / 12
प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे समजून वागा, असे मी स्वतः वेळोवेळी सांगत आहे. कारण काळजी घेतली नाही तर हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी.
8 / 12
कोरोनाच्या नागपुरातील एन्ट्री नंतर अत्यावश्यक सेवा म्हणून कार्य करताना माझ्यासोबत माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने आवश्यक ती सर्व काळजी घेतली. मात्र, सेवा देताना कुठे ना कुठे कोरोना रुग्णांशी संपर्क येत गेला.
9 / 12
यातून मनपाचे कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. आज मी स्वतः पॉझिटिव्ह निघालो. काळजी म्हणून मी गृह विलगीकरणात राहीन. परंतु, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही.
10 / 12
मी जेथे असेल तेथून नागपुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. कारण मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील.
11 / 12
जे पॉझिटिव्ह आलेत त्यांना योग्य उपचार मिळावे, यासाठी व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा माझा संकल्प या काळातही पूर्णत्वास नेईन, हा विश्वास देतो. We shall Win...!
12 / 12
कोरोना लॉकडाऊन आणि उपाययोजना संदर्भात तुकाराम मुंढेंनी केलेल्या कामाचं अनेकांनी कौतुक केलंय.
टॅग्स :nagpurनागपूरtukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल