Water in the Legislative Assembly
विधानभवनात बत्ती गुल, जिकडे-तिकडे पाणीच पाणी By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 4:31 PM1 / 8नागपूर येथे अधिवेशनात कामकाजावेळी सभागृहातील बत्ती गूल झाल्याने विरोधी आमदारांनी मोबाईलच्या प्रकाशात सरकारचा निषेध नोंदवला. 2 / 8विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बत्ती गूल झाल्यानंतर मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात कार्यालयात चर्चा केली.3 / 8मुख्यमंत्र्यांच्या नावाने घोषणाबाजी करत विरोधकांनी अंधारातही आपला निषेध सुरुच ठेवला. मोबाईलमध्ये टॉर्च लावून सभागृहाच्या पायरीवर बॅनरबाजी केली.4 / 8विधानभवताना पावसामुळे आमदारांची वाताहत झाल्याचे पाहायला मिळाले. रिमझिम पावसामध्ये छत्रीचा आधार घेत आमदार अजित पवारांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 5 / 8नागपूर विधानभवन परिसरात अधिवेशनकाळात नेत्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ दिसून येत आहे. मात्र, पावसापुढे सर्वांनीच गुडघे पाण्यात टाकल्याचेही दिसते.6 / 8सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे नागपूर विधानभवन परिसरात तळे साचले की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे दिसून येते आहे.7 / 8ऐन अधिवेशनकाळात विधान भवन परिसरात पाणीच-पाणी झाली आहे. त्यामुळे या पाण्यापासून कशी सुटका करावी, असाच विचार येथील नेते, कार्यकर्ते आणि कर्मचारी करत असतील यात शंका नाही.8 / 8नागपूर येथील अधिवेशनात पत्रकारांनाही बातम्यांसाठी कसरत करावी लागली. हातात माईक घेऊन पाण्यातून मार्ग काढताना माध्यमांचे प्रतिनिधी या छायाचित्रात दिसत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications