The work of the Nagpur Metro is being done by the workers in danger
जीव धोक्यात घालून कामगार करत आहेत नागपूर मेट्रोचं काम By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 6:45 PM1 / 5नागपुरात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो रेल्वेचे काम सुरू असून यावेळी कामगारांचा जीव धोक्यात घातला जात असून, कामगारही सुरक्षेचे नियम न पाळता काम करत असल्याचं समोर आलं आहे. 2 / 57 सप्टेंबर रोजी रामझुल्याजवळ काम सुरू असताना अचानक हायड्रा मशिन कोसळली. मात्र, दैव बलवत्तर असल्याने यात कुणीही जखमी झाले नाही. त्यावेळी मजूर काही वेळासाठी बाजूला गेले होते, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. काम करत असणारे काही मजूर सेफ्टी हॅल्मेट न वापरताच काम करत आहेत. 3 / 5ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर असा मेट्रो रेल्वेचा मार्ग साकारला जात आहे. ८ हजार ६८० कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या ३८ कि.मी.च्या मार्गावर मेट्रो धावणार आहे. प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू असून करोडो रुपयांच्या मशिनी लाखो रुपये भाडे देऊन नागपुरात आणण्यात आल्या आहेत.4 / 5याआधी मिहान परिसरात काम करत असताना गर्डर कोसळल्याने मजूर जखमी झाला होता. त्यानंतर हिंगणा मार्गावर पिअरसाठी (पिलर) तयार केलेला लोखंडी पिंजरा वाऱ्यामुळे भररस्त्यात कोसळला होता. मात्र, सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुणी नसल्याने दुर्घटना टळली होती. 5 / 5२०१९ मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे धावणार असल्याचा विश्वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications