नाशिक : महिलांचे महाविद्यालय म्हणून ओळखले जाणारे नाशिकरोड येथील नंदकिशोर भुतडा फाउण्डेशन संचलित सॅव्ही वुमेन कॉलेजमध्ये सोमवारपासून ‘डेज सेलिब्रेशन’ सुरू झाले. पहिल्याच दिवशी विविध वाद्यांसोबत ‘पंक-रॉक’ लूकमध्ये तरुणींनी महाविद्यालयात एन्ट्री मारली. त्यामुळे महाविद्यालयाच्या कॅम्पसचा नूर वेगळाच पहावयास मिळाला. तरुणींच्या हातात गिटार आणि म्युजिशियनच्या रॉकस्टाईल लूक बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ‘पंक-रॉक डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.पुढील आठवडाभर डेजचा माहौल महाविद्यालयात पहावयास मिळणार आहेत. यामध्ये तरुणींच्या कलागुण विकसीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉलिवूड डे, गॉसिक डे, रेट्रो डे, रॉयल डे तरुणी साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.आठवडाभरापुर्वी पाककला, किमान-कौशल्य स्पर्धा, रांगोळी, मेहंदी आर्ट, झुम्बा कार्यशाळा, संगीत कार्यशाळा, ज्वेलरी मेकिंग कार्यशाळा पार पडल्या. यामध्येही तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दहावी, बारावी किंवा पदवीनंतर विविध पदविका अभ्यासक्रमासाठी या महाविद्यालयात प्रवेश घेतात.