शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 5:11 PM

1 / 12
नाशिकमध्ये मागील तीन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून मागील 24 तासांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे.
2 / 12
गंगापूर धरणातून कुठल्याहीप्रकारे विसर्ग करण्यात आलेला नसला तरीदेखील गोदापात्रातील दुतोंड्या मारूतीची मुर्ती गुडघ्यापर्यंत पाण्यात बुडाली असून गोदापात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
3 / 12
नाशिकमध्ये रविवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसाचा इशारा मुंबई येथील वेधशाळेकडून देण्यात आला आहे.
4 / 12
नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
5 / 12
गरज भासल्यास नाशिककरांनी घराबाहेर पडावे. नदीपात्रालगत जाऊ नये. नदीकाठावरील रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन अग्निशमन दलाकडून केले जात आहे.
6 / 12
नाशिकमध्ये आज दिवसभर जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
7 / 12
पावसाची संततधार सुरू आहे. वालदेवी नदीला पूर आला आहे.
8 / 12
शनिवारी रात्री नऊ वाजेपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली. रविवारी पहाटे साडेपाच वाजेपासून सकाळी साडे आठवाजेपर्यंत शहरात 32.8मि.मीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली.
9 / 12
शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपासून रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 70.5 मिमी पाऊस पडल्याची माहिती पेठरोडवरील हवामान केंद्राने दिली.
10 / 12
मागील 24 तासांपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची नवीन आवक सुरू.
11 / 12
धरणसाठा 15.22 टक्के. पहाटे 6 वाजेपर्यंत गंगापूर क्षेत्रात 96 मिमी. पाऊस
12 / 12
पिंपळगाव बहुला येथील नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पुल पावसाच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
टॅग्स :godavariगोदावरीriverनदीNashikनाशिकRainपाऊस