शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nashik Oxygen Leakage: ऑक्सिजन गळतीनंतर धावाधाव, पाहा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 2:42 PM

1 / 13
नाशिक : महापालिकेच्या जुने नाशिक भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळती झाली.
2 / 13
या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.
3 / 13
नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली.
4 / 13
या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत.
5 / 13
ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे.
6 / 13
या घटनेची माहिती मिळताच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रूग्णालयात पाठविण्यात आले.
7 / 13
रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीनंतर तब्बल 2 तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली.
8 / 13
ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
9 / 13
दरम्यान, ऑक्सिजन गळती झालेली 10 के एलची टाकी आहे. 15-20 दिवसांपूर्वीच टाकी बसविली होती. नाशिक महापालिकेने न्यू बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात ठेकेदारामार्फत भाड्याच्या टाक्या बसविल्या आहेत. (सर्व फोटो- अझहर शेख)
10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळती