शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात विविध रंगांची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 11:18 AM

1 / 6
नवरात्रोत्सव अर्थात देवीचा उत्सव... ‘बोलो अंबे माता की जय..’चा जयघोष करत नाशिक शहरात सर्वत्र नवरात्रोत्सव रंगात आला आहे. (फोटो - प्रशांत खरोटे, नाशिक)
2 / 6
नाशिकच्या सप्तश्रृंगी गडापासून थेट शहरातील कालिका माता मंदिरापर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. कालिका देवी मंदीर, भगूरचे रेणूका देवी मंदिर परिसरात यात्रोत्सव बहरला आहे.
3 / 6
नवरात्रोत्सवात शहरातील विविध लॉन्स्मध्ये दांडिया व गरबानृत्याचा तरूणाई मनमुराद आनंद लुटताना दिसून येत आहे.
4 / 6
पारंपरिक पोशाखात तरूण-तरूणी गरब्यासाठी हजेरी लावून थिरकताना दिसून येत आहे.
5 / 6
नाशिकच्या गोदाकाठावरील सांडव्यावरील देवी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पारंपरिक पोशाखात गोंधळ येते पाहायला मिळत आहे.
6 / 6
नाशिकच्या बंगाली बांधवांच्या वतीने बंगा संजोग फाऊंडेशनच्या वतीने दुर्गा पूजा महोत्सव मोठ्या उत्साहात गंगापूररोडवर साजरा केला जात आहे. या ठिकाणी दूर्गामातेच्या भव्य मूर्तीचा आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे.
टॅग्स :Navratriनवरात्रीNashikनाशिक