A trolley of Mumbai-Gorakhpur Antyodaya Express derails near Nashik, no injuries
...अन् थोडक्यात बचावले हजारो रेल्वे प्रवाशांचे प्राण By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 1:01 PM1 / 5मुंबई नाशिक रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे ३:३० वाजता प्रवासी साखर झोपेत असताना मुबंईहून गोरखपुरला जाणाऱ्या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला. 2 / 5सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यामुळे नाशिककडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.3 / 5कसारा घाट माथ्याच्या वळणावर भीमा 2 पुलावर या गाडीच्या एका डब्याचे रुळावर चाक घसरल्याने मोठी दुर्घटना टळली. मोठा अपघात झाला असता तर जवळपास 100 ते 150 फूट खोल डबे खाली पडले असते. 4 / 5जर पुलावरून डबा खाली पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. पहाटेपासून गाडी पुलावर उभी असल्याने प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते. काही तासानंतर रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष ट्रेन पाठविण्यात आली. 5 / 5या अपघातामुळे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications