शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० वर्ष शिक्षा, ७ लाख दंड...; कोणत्या कायद्याविरोधात देशभरात ट्रकचालक आक्रमक झालेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 3:40 PM

1 / 9
देशभरात वाहतूक संघटना आणि वाहन चालक मोठ्या प्रमाणात निदर्शने करत आहेत. अनेक संघटनांनी महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. वाहन चालकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.
2 / 9
बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हरसह वाहन चालक आंदोलन का करतायेत? ज्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होतेय. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीत लोक अडकले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय
3 / 9
केंद्र सरकारने हिट अँन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. ज्याच्याविरोधात बस, ट्रक चालकांनी आंदोलन पुकारले आहे. हा कायदा ड्रायव्हरांच्या हिताचा नाही असं वाहन चालकांचे म्हणणं आहे.
4 / 9
देशात लागू होणाऱ्या या नव्या हिट अँन्ड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. त्यात काही वाहने रस्त्यावर दिसत आहे. मोटार वाहन कायद्यात सुधारणा करावी अशी मागणी करत मध्य प्रदेशातील खंडवा इथं चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
5 / 9
देशभरात ट्रान्सपोर्ट यूनियनने भारतीय कायद्यातील या तरतुदीविरोधात आंदोलन पुकारले आहे. विशेष म्हणजे यूनियन नव्या कायद्यातील हिट अँन्ड रन प्रकरणासंबंधी होणाऱ्या शिक्षेबाबत चिंतेत आहेत. हा कायदा कठोर असल्याचे संघटना म्हणत आहेत. त्यामुळे हा कायदा परत घ्यावा अशी युनियनची मागणी आहे.
6 / 9
भारतीय कायद्यातील हिट अँन्ड रन कायद्यानुसार, जर कुठलाही आरोपी रस्ते अपघातात ड्रायव्हर पळून जातात. त्याला १० वर्षाची शिक्षा भोगावी लागेल. त्याचसोबतच ७ लाखांचा दंडही भरावा लागणार आहे. नव्या कायद्यात २ वर्ग करण्यात आले आहेत.
7 / 9
पहिला निष्काळजीपणामुळे मृत्यू, जर आरोपी ड्रायव्हर मृत्यूचे कारण बनत असेल तर तर निर्दोष हत्या नाही. त्याला अधिकाधिक ५ वर्ष जेलसह दंड भरावा लागू शकतो.
8 / 9
दुसरे, ड्रायव्हर काळजी न घेता किंवा निष्काळजीपणे वाहन चालवून एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो आणि पळून जातो. तसेच, घटनेनंतर पोलिस अधिकारी किंवा दंडाधिकार्‍यांकडे घटनेची माहिती देत नाही, तर त्याला दंडासह दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल.
9 / 9
सध्या, आरोपीची ओळख पटल्यानंतर, हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपींवर कलम 304A अंतर्गत खटला चालवला जातो, ज्यामध्ये जास्तीत जास्त दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.
टॅग्स :AccidentअपघातCentral Governmentकेंद्र सरकार