12 crore luxury Mercedes-Maybach S650 car arrives in PM Narendra Modi's fleet
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात दाखल झाली १२ कोटींची आलिशान मर्सिडिज-मेबॅक S650 कार, अशी आहेत खास वैशिष्ट्ये By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 12:29 PM1 / 5 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात आलिशान मर्सिडिझ-मेबॅक एस ६५० ही चिलखती कार दाखल झाली आहे. ही कार रेंज रोव्हर वोग आणि टोयोट लँड क्रूझरच्या माध्यमातून अपग्रेड केले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हल्लीच नव्या मेबॅक ६५० कारमध्ये पहिल्यांदा हैदराबाद हाऊसमध्ये पाहिले गेले होते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यावेळी मोदी या कारमधून त्यांना भेटण्यासाठी गेले होते. 2 / 5मर्सिडिझ-मेबॅक एस६५० गार्ड व्हीआर १० लेव्ह प्रोटेक्शनसह लेटेस्ट फेसलिफ्टेड मॉडेल आहे. हे कुठल्याही प्रॉडक्शन कारमध्ये करण्यात आलेले सर्वाधिक प्रोटेक्शन आहे. रिपोर्ट्सनुसार, मर्सिडिझ-मेबॅकने गेल्यावर्षी भारतामध्ये एस६०० गार्डला १०.५ कोटी रुपयांमध्ये लाँन्च करण्यात आले होते. तसेच एस६५० ची किंमत १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकते. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजीकडून नव्या कारसाठी विनंती करण्यात येत असते. 3 / 5एसपीजी सुरक्षेशी संबंधित सर्व गरजांची माहिती घेते. तसेच ज्या व्यक्तीचे संरक्षण ते करतात त्यांच्यासाठी एका नव्या वाहनाची आवश्यकता आहे की नाही, याची निश्चिती केली जाते. मर्सिडिझ-मेबॅक एस६५० गार्ड ६.० लीटर ट्विन टर्बो व्ही१२ इंजिनाच्या माध्यमातून संचालित होते. ती ५१६ बीएचपीची पॉवर आणि ९०० एन्एमचा टॉर्क देते. 4 / 5या कारचा कमाल वेग १६० किमी प्रती तास आहे. कारची बॉडी आणि खिडक्या ह्या स्टील कोअर बुलेटचाही सामना करू शकतात. तसेच बॉम्ब प्रुफ वाहन रेटिंगसुद्धा मिळाले आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामधून प्रवास करणारे लोक केवळ दोन मीटरच्या अंतरावर होणाऱ्या १५ किमी पर्यंतच्या टीएनटी स्फोटापासूनही सुरक्षित राहू शकतात. 5 / 5या गाडीच्या खिडक्यांना पॉलिकार्बोनेटने कोट करण्यात आले आहे. ते अतिरिक्त संरक्षण प्रदान करते. तसेच गॅस हल्ला झाल्यास अशा स्थितीत केबिनला स्वतंत्रपणे एअर सप्लाय होते. कारच्या फ्युएल टँकला एका विशेष पदार्थाचा थर चढवण्यात आला आहे. तो गोळी लागून छिद्र पडल्यास स्वयंचलीत पद्धतीने ते सील करतो. हे आवरण त्याच पदार्थाचे आहे ज्याचा वापर बोईंगकडून त्यांच्या एएच-६४ अपाचे टँक अॅटॅक हेलिकॉप्टर्ससाठी करते. ही गाडी विशेष रन फ्लॅट टायरांवरही चालते. ते नुकसानग्रस्त झाल्यानंतरही काम करणे सुरू ठेवतात. तसेच कारचे इंटिरियरही खास आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications