शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शाब्बास पोरी! अवघ्या १९ व्या वर्षी शेतकऱ्याची मुलगी बनली पायलट; बापानं शेतजमीन विकली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 7:58 PM

1 / 8
गुजरातच्या सूरत इथे राहणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील १९ वर्षीय मुलगी पायलट बनली आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीला पायलट बनण्यासाठी जेव्हा सरकारी बँकेने कर्ज दिलं नाही तेव्हा शेतकरी पित्यानं स्वत:ची शेतजमीन विकून मुलीचं स्वप्न साकार केले.
2 / 8
सूरतमध्ये राहणारी मैत्री पटेल अमेरिकेहून पायलट बनून परतली आहे. इतक्या कमी वयात मुलगी पायलट बनल्यानं आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. मैत्रीचे वडील कांतीभाई पटेल आणि आई रेखा पटेल यांनी मुलीचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्याजवळची शेतीही विकली.
3 / 8
१२ वीचं शिक्षण घेतल्यानंतर पायलट बनणण्यासाठी मैत्री अमेरिकेला गेली होती. केवळ ११ महिन्यात प्रशिक्षण पूर्ण करून मैत्रीनं व्यावसायिक पायलटचं परवाना हाती मिळवण्यात यश संपादन केले आहे.
4 / 8
मैत्री पटेलनं सांगितले की, जेव्हा मी ८ वर्षाची होती तेव्हापासून विमान पायलट बनण्याचं स्वप्न पाहत आहे. लहानपणी पाहिलेले स्वप्न वयाच्या १९ व्या वर्षी पूर्ण केले. मैत्री आता यापुढे जाऊन कॅप्टन बनू इच्छिते. आयुष्यात स्वत:ची वेगळी ओळख बनवण्याचं स्वप्न मैत्रीनं पाहिलं आहे.
5 / 8
एक काळ होता जेव्हा मैत्रीच्या वडिलांकडे मुलीला पायलट प्रशिक्षण देण्यासाठी पैसे नव्हते. अनेक बँकांकडे कर्जासाठी हात पसरले परंतु सगळीकडे निराशा आली. परंतु कुठल्याही बँकेने त्यांना कर्ज देण्यास नकार दिला. अखेर हतबल झालेल्या बापानं शेतजमीन विकून मुलीच्या पायलट प्रशिक्षणासाठी पैसे भरले.
6 / 8
सर्वसामान्यपणे व्यावसायिक विमान उड्डाण प्रशिक्षण घेण्याचा काळ १८ महिन्यांचा असतो. खूप कमीजण १८ महिन्यात ट्रेनिंग पूर्ण करू शकतात. अशावेळी ६ महिने प्रशिक्षणात मुदतवाढ दिली जाते. परंतु मैत्री पटेलनं ११ महिन्यातच व्यावसायिक पायलटचं ट्रेनिंग पूर्ण केले.
7 / 8
माहितीनुसार, अमेरिकेत व्यावसायिक विमान उड्डाणासाठी मैत्री पटेलला परवानादेखील मिळाला आहे. परंतु भारतात विमान उड्डाणासाठी मैत्रीला येथील नियमांनुसार ट्रेनिंग परवाना घ्यावा लागेल.
8 / 8
देशात ट्रेनिंग परवाना मिळताच मैत्री भारतातही विमान उड्डाण करू शकेल. केवळ १९ व्या वर्षी पायलट बनून मैत्री पटेल देशातील सर्वात कमी वयाची पायलट बनली आहे.
टॅग्स :Farmerशेतकरीpilotवैमानिक