शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

1999 मध्ये सौरभ कालिया यांच्यासह सहा जवान सापडले होते पाकिस्तानच्या कैदेत, अमानूष छळ करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 5:36 PM

1 / 6
विमान कोसळून तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने आज सुटका केली आहे. मात्र 20 वर्षांपूर्वी 1999 मध्ये कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासह 6 जवानांची ताब्यात घेऊन निर्घृण हत्या केली होती.
2 / 6
सौरभ कालिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पाकिस्तानने परत केल्यावर त्यांच्यावर किती अत्याचार झाले होते, हे समोर आले.
3 / 6
मे 1999 मध्ये सौरभ कालिया यांना पाकिस्तानी घुसखोरीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी पाकिस्तानने त्यांना पकडले होते.
4 / 6
सौरभ कालिया यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक यातना देण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणात झालेल्या मारहाणीमुळे त्यांच्या शरीरातील बहुतांश हाडे तुटली होती.
5 / 6
सौरभ कालिया यांच्यासोबत नरेश सिंह, भीखा राम, बनवारी लाल, मूला राम आणि अर्जुन राम हे जवान होते.
6 / 6
बटालिक परिसरात गस्तीवर असतावा सौरभ कालिया आणि त्यांच्या साथीदारांना पाकिस्तानने कैद केले होते.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवान