शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आजपासून 200 विशेष रेल्वे धावणार; प्रवाशांसाठी 'या' खबरदारीच्या सूचना…

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 10:49 AM

1 / 12
देशात 1 जूनपासून 2020 पासून देशात विशेष रेल्वे धावणार आहेत. या रेल्वे श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांच्या व्यतिरिक्त असणार आहेत.
2 / 12
या रेल्वे गाड्यांचे तिकीट आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपसह रिझर्व्हेशन काऊंटर आणि तिकीट एजंट्सकडून प्राप्त करता येणार आहे.
3 / 12
24 मेला पहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशातली रेल्वे सेवा थांबविण्यात आली होती. आता ही सेवा सुरू होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
4 / 12
या पहिल्या टप्प्यात देशातल्या निवडक मार्गावर 200 रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्याचा टाईम टेबलही रेल्वेने प्रसिद्ध केले आहे.
5 / 12
या रेल्वे गाड्यांचे बुकिंग 21 मे रोजी रेल्वेने सुरू केले होते. आरक्षणाचा कालावधी आता 30 दिवसांवरून 120 दिवस करण्यात आला आहे.
6 / 12
याचबरोबर, आजारी व्यक्ती, लहान मुले यांनी प्रवास टाळावा असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. तसेच रेल्वेचा प्रवास करताना प्रवाशांना काही नियम पाळणेही सक्तीचे करण्यात आलं आहे.
7 / 12
त्यानुसार, केवळ कन्फर्म/आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांना स्थानकात येण्याची तसेच रेल्वेत प्रवेशाची अनुमती मिळणार आहे.
8 / 12
प्रवाशांना रेल्वे रवाना होण्याच्या 90 मिनिटांपूर्वी रेल्वेस्थानकावर पोहोचवावे लागणार आहे. रेल्वेस्थानकावर प्रवेश तसेच बाहेर पडताना स्क्रीनिंग होईल. याचबरोबर, सदैव मास्क परिधान करावे लागणार आहे.
9 / 12
रेल्वे प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारचे कॅटरिंग शुल्क आकारणार नाही. रेल्वेत प्रवाशांना ब्लँकेट, चादर किंवा उशी मिळणार नाही.
10 / 12
याशिवाय, प्रवाशांनी आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करावा. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
11 / 12
200 विशेष रेल्वेगाड्यांचे प्रवासभाडे सामान्य असणार आहे.आरक्षित असल्याने जनरल डब्यांसाठी सेकंड सीटिंगचे (2एस) प्रवासभाडे आकारले जाणार आहे.
12 / 12
तसेच, सर्व प्रवाशांना आसन उपलब्ध केले जाणार आहे. या रेल्वेगाड्यांमध्ये पार्सल आणि सामानाचेही बुकिंग होऊ शकेल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे