ओव्हर स्पीड सोडा, आता धीम्या गतीनं वाहन चालवलं तरी दंड; ५०० ते २,००० रुपयांची पावती फाडावी लागणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:30 IST
1 / 10वाहतूक विभागाकडून आखून देण्यात आलेल्या नियमावलीनुसार निर्धारित केलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहन दामटवलं तर दंड भरावा लागण्याची भीती आजवर वाहन चालकांना होती. पण आता धीम्या गतीनं वाहन चालवलं तरी दंड आकारला जात आहे. 2 / 10देशातील एक्स्प्रेस-हायवेवर किमान गतीपेक्षा धीम्या गतीनं वाहन चालवलं तर वाहनचाकलांवर दंड आकारला जात आहे. असं करणं हा वाहनचालकाचा निष्काळजीपणा मानला जाईल आणि यासाठी खूप मोठी रक्कम तुम्हाला दंड म्हणून भरावी लागू शकते. 3 / 10एक्स्प्रेस-वेवर किमान वेगमर्यादेपेक्षा धीम्या गतीनं वाहन चालवलं तर ५०० ते २ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवरील हे वास्तव आहे.4 / 10दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे तयार आहे. पण अजूनही तो पूर्णपणे वापरात उपलब्ध नाहीय. दिल्लीच्या बाजूनं मेरठच्या दिशेनं जाताना गाझियाबादजवळ लालकुआं फ्लायओव्हरजवळ अजूनही निर्माण कार्य सुरू आहे. 5 / 10ज्यांना मेरठला जायचं आहे आणि ज्यांना गाझियाबादला जायचं आहे अशी सर्व वाहनं दिल्लीहून गाझियाबाद-मेरठच्या दिशेनं येताना विजय नगर येथे गर्दी करतात. त्यामुळे याठिकाणी खूप ट्राफिक होतं. कधीकधी तर हायवेवरच जाम निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. 6 / 10एक्स्प्रेस वेवर सध्या ओव्हरटेक करणाऱ्या आणि गतीचं पालन न करणाऱ्या वाहनांना दंड आकारण्यात येत आहे. 7 / 10दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर गतीची मर्यादा कारसाठी १०० किमी प्रतितास तर जड वाहनांसाठी ८० किमी प्रतितास इतकी आहे.8 / 10'राजमार्ग आणि पेरिफेरल एक्स्प्रेस-वेवर बहुतांश अपघात ओव्हरटेक करण्याच्या नादात होतात. यावर नियंत्रण मिळवणं प्राधिकरणाची प्राथमिकता आहे. तसंच या मार्गावर काही निष्काळजी वाहन चालक मुद्दाम निर्धारित किमान वेगापेक्षाही कमी वेगानं वाहन चालवतात हेही एक कारण आहे', असं राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं सांगितलं. 9 / 10राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून आतापर्यंत निर्धारित कमाल वेगापेक्षा अधिक वेगानं वाहन चालवू नका याचा प्रचार केला जात होता. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओव्हरटेकच्या बाबतीत सावधानता बाळगणं आणि किमान निर्धारित वेगापेक्षा कमी वेगानं वाहन चालवू नये याबाबतचाही प्रचार करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. 10 / 10किमान वेगमर्यादेपक्षाही कमी वेगानं एक्स्प्रेस-वेवर वाहन चालवल्यास वाहन चालकाला ५०० रुपयांपासून २ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. तसंच कमाल वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहन चालवल्याबद्दल होणारी कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.