शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

18 तासांत 25 किमीचा डांबरी रस्ता, 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

By महेश गलांडे | Published: February 26, 2021 4:34 PM

1 / 9
केंद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. गडकरींनी देशातील रस्त्यांच्या कामातून स्वत:ची वेगळीच प्रतिमा निर्माण केलीय.
2 / 9
शहरांमध्ये फ्लाय ओव्हर बांधणे असो किंवा राष्ट्रीय आणि राज्य मार्गांचा रस्ता असो, चौपदीकरण असो किंवा आठ पदरीकरणाचा रस्ता बांधणे असो, गडकरींचं नाव निघणारच.
3 / 9
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरुनही जाताना गडकरींच्या कामाची आठवण होते, म्हणून दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे हे गडकरींना रोडकरी असे म्हणायचे.
4 / 9
आता, पुन्हा एकदा गडकरींच्या नेतृत्त्वात सोलापूर-विजापूर महामार्गवरील रस्ते बांधकामाने एक विक्रम निर्माण केलाय. सोलापूर विजापूर मार्गावर 18 तासात 25.54 किमी रस्ता (एक पदरी) बांधला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये याची नोंद होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
5 / 9
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतेच सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करताना, 25.54 किलोमीटरचा सिंगल लेन रस्ता केवळ 18 तासांत पूर्ण केलाय.
6 / 9
ठेकेदार कंपनीच्या 500 कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत. या कर्मचाऱ्यांसह मी राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना प्रबंधक, अधिकारी, ठेकेदार कंपनीचे सर्व प्रतिनीधी आणि परियोजना अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, असे गडकरींनी म्हटलंय.
7 / 9
सद्यस्थितीत सोलापूर-विजापूर राज्यमार्गाच्या 110 किमीचं काम प्रगतीपथावर आहे. हे काम ऑक्टोबर 2021 पर्यंत पूर्ण होईल, असेही गडकरींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय.
8 / 9
सोलापूर-विजापूर हा महामार्ग पूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जात होता. शिवाय उत्तर आणि दक्षिण भारताला जोडला जाणारा रस्ता म्हणून एनएच 52 ओळखला जातो.
9 / 9
सोलापूर आणि विजापूर चौपदरीकरणादरम्यान येथे बायपास रस्ते काढले जाणार आहेत. तसेच या मार्गात सहा उड्डाणपूल असणार आहेत.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीSolapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षा