शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनादरम्यान 'या' राज्‍यात 25 हजार डुकरांचा मृत्यू, आजाराचं केनिया कनेक्शन...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 8:57 PM

1 / 5
आयझोल: देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसतीये. यातच आता मिझोराममध्ये मार्च महिन्यापासून आफ्रिकन स्वाइन फीवर (एएसएफ) च्या प्रादुर्भावामुळे 25,260 डुकरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आतापर्यंत 121 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झालयं. राज्याच्या पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
2 / 5
पहिलं प्रकरण मार्चमध्ये-डुकरांवरील हा संसर्गजन्य रोग पाहता, निरोगी डुकरांमध्ये या रोगाचा आणखी प्रसार रोखण्यासाठी आतापर्यंत 9,460 हून अधिक डुकरांना मारण्यात आलंय. मार्च महिन्यात दक्षिण मिझोरामच्या लुंगलेई जिल्ह्यातील लुंगसेन गावात डुकराचा मृत्यू झाल्याचं पहिलं प्रकरण आढळलं होतं.
3 / 5
11 जिल्ह्यात संसर्ग-डुकरांच्या अचानक होणाऱ्या मृत्यूनंतर अनेक मृत डुकरांचे नमुने भोपाळमधील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हाय सिक्योरिटी अॅनिमल डिजीज येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर या डुकरांचा मृत्यू ASF मुळे झाल्याची माहिती समोर आली. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, राज्यभरातील सर्व 11 जिल्ह्यांमधील किमान 239 गावांमध्ये एएसएफचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
4 / 5
माणसांमधून संसर्गाची शक्यता-ASF हा आजार पहिल्यांदा केनियात 1921 मध्ये आढळला होता. काही तत्ज्ञांच्या मते, माणसांना ASF ची लागण होत नाही, पण ते व्हायरसचे वाहक असू शकतात. आजपर्यंत या विषाणूविरूद्ध कोणतीही लस तयार झालेली नाही. जवळजवळ प्रत्येक वर्षी, ईशान्य विभागातील विविध राज्यांमध्ये एएसएफमुळे शेकडो डुकरांचा मृत्यू होतो.
5 / 5
डुकरांच्या मांसाला मोठी मागणी-पूर्वोत्तरमध्ये डुकरांच्या मांसाला मोठी मागणी आहे. त्या परिसरातील डुकरांच्या मांसाची वार्षिक उलाढाल जवळपास 8,000-10,000 कोटी रुपयांची आहे. यातील सर्वात मोठा वाटा आसामचा आहे. येथील लोकांना डुकरांचं मांस खूप आवडंत. पण, आता रोग आल्यानंतर नागरिकांना काही दिवस डुकरांचे मांस खाऊ नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
टॅग्स :mizoram-pcमिजोरम