3 lakh 81 thousand people vaccinated so far 580 adverse events following immunisation
Coronavirus Vaccination: देशात आतापर्यंत ३ लाख ८१ हजार लोकांना दिली लस, ५८० जणांना लसीचे साइड इफेक्ट! By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 9:46 PM1 / 10नवी दिल्ली : देशात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ३ लाख ८१ हजारांहून अधिक लोकांना कोरोना व्हायसरवरील लस देण्यात आली आहे. 2 / 10आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, देशात आतापर्यंत एकूण ३ लाख ८२ हजार ३०५ लोकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ४८ हजार २६६ लोकांना लस देण्यात आली.3 / 10दरम्यान, कोरोना लस दिल्यानंतर उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.4 / 10आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा लसीकरणामुळे मृत्यू झाला नाही. पोस्टमार्टम अहवालात हा खुलासा झाला आहे. तर कर्नाटकमधील व्यक्तीचे आज पोस्टमार्टम केले जाईल. 5 / 10उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये राहणार्या व्यक्तीला १६ जानेवारीला कोरोनावरील लस देण्यात आली आणि त्याचा १७ जानेवारीला मृत्यू झाला. यानंतर तीन डॉक्टरांच्या समितीने केलेल्या पोस्टमॉर्टममध्ये असे समोर आले आहे की, या व्यक्तीचा मृत्यू हृदय व फुफ्फुसांशी संबंधित आजारांमुळे झाला आहे. याचा लसीशी संबंधित नाही. 6 / 10या व्यतिरिक्त कर्नाटकात राहणाऱ्या एका व्यक्तीला 16 जानेवारीला लस देण्यात आली आणि १८ जानेवारीला या व्यक्तीचा मृत्यू झाला. अद्याप या व्यक्तीचा पोस्टमार्ट रिपोर्ट आली नाही, त्यामुळे मृत्यूचे कारण कळू शकले नाही.7 / 10आंध्र प्रदेशात ९७५८, अरुणाचल प्रदेशात १०५४, आसाममध्ये १८७२, बिहारमध्ये ८६५६, छत्तीसगडमध्ये ४४५९, दिल्लीत ३१११, हरियाणामध्ये ३४४६, हिमाचल प्रदेशात २९१४, जम्मू-काश्मीरमध्ये ११३९, झारखंडमध्ये २६८७, कर्नाटकमध्ये ३६८८८ लोकांना लस देण्यात आली, असे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी म्हटले आहे.8 / 10याचबरोबर, या लसीकरणानंतर आतापर्यंत देशात साईड इफेक्ट्सची प्रकरणे ५८० रुग्ण नोंदविण्यात आली आहेत. यापैकी सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.9 / 10याआधी रविवारी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर आणि तामिळनाडूमध्ये ५५३ सत्रांमध्ये १७०७२ लोकांना लस देण्यात आली. 10 / 10शनिवारी या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली, त्यावेळी सुरुवातीला एम्स रूग्णालयातील सफाई कर्मचारी मनीष कुमार यांना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत कोरोनाची पहिली लस देण्यात आली. त्यामुळे मनीष हे देशाच्या राजधानीत लस घेणारे पहिला व्यक्ती ठरले. आणखी वाचा Subscribe to Notifications